शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुसाठी १६८६ मतदारांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:15 AM

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी उशिरा सायंकाळी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली ...

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी उशिरा सायंकाळी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात १६८६ मतदार असून, २१ संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. येत्या १० दिवसात सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ११ वर्षांनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक होणार आहे. सप्टेंबर महिन्याअखेर अथवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा विभागीय उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीत ही निवडणूक होणार आहे. १४ ऑगस्टपासून पुढे ४५ दिवसात एकुणच निवडणूक प्रक्रिया पार पाडणे ही नियमावली आहे. एकंदरीत २१ संचालक पदासाठी ही निवडणूक होत असून, जिल्ह्यातील दिग्गजांचे राजकीय अस्तित्व पणाला या निमित्याने लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र बसणारे नेते या ‘सहकार’ क्षेत्रातील निवडणुकीत एकमेकांविरूद्ध शड्डू ठोकतील, असे चित्र दिसून येत आहे. सहकारी नागरी बॅंक, वैयक्तिक मतदार संघ, सेवा सहकारी सोसायटी, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व व्हीजेएनटी प्रवर्गातून २१ उमेदवार संचालकपदासाठी निवडणूक लढणार आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दिग्गज नेते संचालक पदासाठी उमेदवार म्हणून पुढे येतील, अशी शक्यता आहे.

-----------------

अशी आहे मतदार संख्या

- वैयक्तिक मतदार संघ क (१) : ५८१

- सहकारी नागरी बॅंक मतदार संघ क (२) : ५०१

- १४ सेवा सहकारी सोसायटी : ६०४

-------------------

तालुकानिहाय सेवा सहकारी सोसायटीचे मतदार

अमरावती : ४३

धामणगाव रेल्वे : ३३

धारणी : १९

अचलपूर : ५०

चिखलदरा: १६

वरुड : ६०

भातकुली : ४०

नांदगाव खंडेश्वर : ३९

चांदूर रेल्वे : ३०

दर्यापूर : ७५

चांदूर बाजार :४१

मोर्शी : ६७

अंजनगाव सुर्जी : ५६

तिवसा : ३६

-----------------

असे निवडून येतील २१ उमेदवार

सहकारी नागरी बॅंक मतदार संघातून १, वैयक्तिक मतदार संघ १, सेवा सहकारी सोसायटीमधून १४, महिलांमधून २, ओबीसीतून १, अनुसूचित जातीमधून १ तर व्हीजेएनटी प्रवर्गातून १ असे २१ उमेदवार निवडून येतील, अशी निवडणुकीची रचना आहे.

--------------

पाच उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदानाचा हक्क

वैयक्तिक मतदार संघ, सहकारी नागरी बॅंक मतदार संघ, १४ सेवा सहकारी सोसायटी प्रवर्गातील १६ उमेदवारांना मतदान करावे लागेल. याशिवाय दोन महिला, ओबीसी १, अनुसूचित जाती १ आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील १ असे पाच उमेदवारांना स्वंतत्रपणे एकूण १६८६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे.