एका वर्षात डिझेल २५ टक्के, खाद्यतेल ४० टक्क्यांनी वधारले, आयात कर, मालवाहतूक दर, अतिपावसाने उत्पादन घटले
अमरावती : आजही देशात ९० टक्के मालवाहतूक ट्रकनेच होते. गत वर्षभरात डिझेलचे दर २५ टक्क्यांनी वधारले. परिणामी मालवाहतूक भाडे वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडले आहे. आयात कर वाढल्याने देशात महागाई शिखरावर पोहोचली आहे.
देशातील दळणवळणात ट्रकची वाहतूक रक्तवाहिन्यांसारखी आहे. मालवाहू ट्रक डिझेलवर चालतात. डिझेलचे भाव वाढल्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तूंच्या भाववाढीवर होतो. जानेवारी २०२० मध्ये ७३ रुपये ४ पैसे प्रतिलिटरने विकले जाणारे डिझेल आजघडीला ९१ रुपये ३५ पैसे दराने विकले जात आहे. सुमारे २५ टक्के वाढ डिझेलच्या किमतीत झाल्यामुळे मालवाहतूक भाडेही त्याच प्रमाणात वाढले आहे.
किराणा सामानात २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पण सर्वाधिक ३५ ते ४० टक्के भाववाढ ही खाद्यतेलात झाली आहे. पावसामुळे तेलबियांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा खाली आले. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वधारले. तसेच केंद्र सरकारने देशातील तेल बियाणांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी भाववाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र, होरपळून निघाला आहे.
बॉक्स
किराणा दर प्रतिकिलो
मार्च २०२०/ सप्टेंबर २०२०/मे २०२१
तूर डाळ---------------- ८७ / ९६/ १०१ (रूपये)
हरभरा डाळ--------------- ५९ ६१/ ७९
तांदूळ------------------------३२/ ३४/ ४१
गहू----------------------२३/२४/२६
बेसन-----------------८१/८७/८९
शेंगदाणा-----------------९१/९३/११०
------------------
बॉक्स
तेलही दुप्पट महाग (दर प्रति लिटर)
तेल मार्च २०२० सप्टेबर २०२० मे २०२१
शेंगदाणा: १४५/१५०, १५८/१६०, १७५/१९०
सूर्यफुल: ८८/९०, १०५/१३०,१६०/१७५
करडी: १५५/१६०. १७५/१८०, २२०/२२५
सोयाबीन : ८५-८८/११०-११५, १५०-१६०
पामतेल: ७६-८०, १००-१०५, १३५-१४०
----------------
डिझेल दराचा (भाव प्रति लिटर)
जानेवारी २०२०---------------७३.०४
जून २०२०------------------ ७८.८४
जानेवारी २०२१----------------८३.०८
मे २०२१--------------९१.३५
--------------
काय म्हणतात नागरिक
कोट
लॉकडाऊन सुरू आहे. पण पोटाला लॉक करता येत नाही. किराणा असो वा खाद्यतेल कितीही भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. अखेर काटकसर करणार तरी किती त्यालाही मर्यादा आहेतच.
- प्रगती बांबोर्डे, बिच्छुटेकडी, अमरावती
कोट
महागाईने बेजार झालो आहे. उत्पादन वाढले नाही. पण महागाई मात्र बोकाळली. घराचे बजेट बिघडले. यामुळे उत्पन्न व खर्चात ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- पूजा रिठे, प्रिंपी निपाणी, नांदगाव खंडेश्र्वर
----------------
कोट
डिझेल दरवाढीमुळे वाहतूक भाडे वधारले. तेल बियांचे उत्पादन घटल्याने निर्यातदार देशांनी निर्यात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली. यामुळे खाद्यतेलाच्या किमती भडकल्या. तेल बियांना चांगला भाव मिळाल्यास शेतकरी तेलबिया लागवडीकडे वळतील. यामुळे केंद्र सरकारने भाववाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप केला नाही. अन्य किराणा साहित्याची वाढ झाली नाही.
- हाजी हारूण, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन