शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

८४१ ग्रामपंचायतींचा भार, शंभर रिक्त पदांचा अतिरिक्त प्रभार

By जितेंद्र दखने | Updated: July 3, 2024 20:35 IST

ग्रामपंचायत इथे, मात्र नियमित ग्रामसेवक नाही येथे?

जितेंद्र दखने, अमरावती : जिल्ह्यात ८४१ ग्रामपंचायती आहेत. तेवढेही ग्रामसेवक अद्यापही जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत. ८४१ ग्रामपंचायतीमध्ये ५१० ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत. यापैकी आजघडीला ४०५ जण कार्यरत आहे, तर १०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त प्रभारावर या ग्रामपंचायतींचा डोलारा चालविला जात आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांची १०६ पदे मंजूर असून, ९३ जण कार्यरत आहे, तर १३ पदे रिक्त आहेत.

सध्या विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना थेट निधी जमा होत असल्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक नसलेल्या गावांमध्ये विकासकामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पंचायत राज व्यवस्थेमधील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केले जाते. याशिवाय राजकारणातील सुरुवातीचे धडेसुद्धा ग्रामपंचायतींमध्ये गिरवले जातात. या ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

महायुतीच्या काळात केंद्र शासनाकडून देण्यात येणारा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता झेडपी, पंचायत समिती किंवा नेत्यांकडे मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहेत. गावाची गरज ओळखून विकासकामे करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना दिले आहेत. परंतु, त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग मात्र दिला जात नाही. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहत असतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळू शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्याचा परिणाम गावातील कामांवर होत आहे.

दृष्टिक्षेपात जिल्हा

ग्रामपंचायती - ८४१मंजूर पदे -५१०भरलेली पदे- ४०५रिक्त पदे-१००

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत