अमरावती महापालिकेकडून हिरवी झेंडी : वीज बचतीसाठी उपाययोजनाप्रदीप भाकरे अमरावतीवीज बचतीसाठी एलईडी बल्ब चा प्राधान्याने वापर करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका, पालिका आणि नगरपंचायत प्रमुखांना दिले आहेत. विधानमंडळाच्या सन २०१५ च्या पहिल्या अधिवेशनात आ. अमित सारम यांनी हा प्रश्न मांडला होता. शहरातील पथदिव्यांच्या कमी प्रकाशामुळे मुलींची छेडछाड, विनयभंग, तसेच खून, बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची लक्षवेधी चर्चा या अधिवेशनादरम्यान करण्यात आली होती. चर्चेदरम्यान या घटनांवर अंकुश लावण्यासाठी एलईडीच्या वापरासंदर्भात सूचना करण्यात आल्यात. एलईडीचा वापर केल्याने विजेची व पर्यायाने पैशाची बचत होते. इतर साधनांपेक्षा अधिक प्रकाश मिळतो. त्या आधारे राज्य सरकारच्या नगरविकास आणि ऊर्जा विभागामार्फत मुंबईच नव्हे, तर सर्व महापालिकांना एलईडी बल्ब लावण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन सभागृहात देण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात एलईडी लावण्यास प्राधान्य द्यावे, व त्यामधून एनर्जी सेव्हिंग करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे आगामी काळात महापालिका, पालिका आणि नगरपंचातीतील क्षेत्र एलईडी बल्बच्या प्रकाशात झळाळून निघण्याचे सुखद चित्र आहे. नागरिकांसाठी एलईडी बल्बघरगुती वीज ग्राहकांना सात वॅटचे एलईडी बल्ब सवलतीच्या दरात महावितरणाकडून देण्यात येत आहे. बाजारात साधारणपणे ३० रुपयांचा एलईडी बल्ब घरगुती वीज ग्राहकांना प्रत्येकी १०० रुपयांमध्ये दिला जात आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील ३० केंद्रावरून ३ डिसेंबरपर्यंत ३.५० लाख बल्बची विक्री झाली. राज्य शासन, एनर्जी इफिसिएंशी सर्व्हिसेस लिमिटेड आणि एसपीएएन यांच्यावतीने ही योजना सुरू आहे. एलईडी बल्बमुळे तब्बल ८० टक्के वीज बचत होत असल्याचा दावा महावितराणाकडून केला जात आहे.अमरावती महापालिकेत ‘एलईडी’ला मंजुरीमहापालिका क्षेत्रात एलईडी बल्ब लावण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. पुणे येथील सायंन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी पार्क या कंपनीने अमरावतीसह याचा सर्वे केला असून सर्व्हेनंतर शहरक्षेत्रात एलईडी लब्ब लावले जाणार आहेत. याबाबत गुरुवारच्या आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
एलईडीने झळाळणार स्थानिक स्वराज्य संस्था
By admin | Published: December 06, 2015 12:02 AM