शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 5:00 AM

हवालाचे स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत. २७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ तास ही मेगा कारवाई चालली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या अगदी पहाटेपासून या जम्बो कारवाईवर लक्ष ठेवून होत्या. 

ठळक मुद्देहवाला प्रकरण, अनेक रडारवर, प्रोपायटरच्या बयाणाची शक्यता

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राजापेठ पोलिसांनी ३ कोटी ५० लाखांच्या हवाला रक्कम प्रकरणात स्थानिक सूत्रधारांचा तपास चालविला आहे. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक, भरणा शक्यच नसल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचली.  दरम्यान, न्यायालयाने तपासाची परवानगी दिल्याने राजापेठ पोलीस आता हवाला प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहे. सबब, हवालाचे स्थानिक सूत्रधार ‘अंडरग्राऊंड’ झाले आहेत. २७ जुलै रोजी राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप भागातून ताब्यात घेतलेल्या दोन महागड्या व एकाच रंगाच्या चारचाकी वाहनांमधून तब्बल ३.५० कोटी रुपये जप्त केले. जप्ती ते मोजदाद व्हाया पंचनामा अशी सलग नऊ तास ही मेगा कारवाई चालली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या अगदी पहाटेपासून या जम्बो कारवाईवर लक्ष ठेवून होत्या. ३.५ कोटींसह चार चालकांना ताब्यात घेतल्यानंतर सकाळी ८.३० च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी फरशी स्टॉप परिसरातील अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची झाडाझडती घेतली. जेथून रक्कम वाहनात भरण्यात आली, तेथून नीलेश भरतभाई पटेल (२७,  ह.मु. फरशी स्टॉप, मूळ रा. सांचल, ता. जि. मैसाणा, गुजरात) व जिग्नेश राजेश गिरीगोसावी (२६, रा. मैसाणा) यांना अटक करण्यात आली. त्या फ्लॅटमधून १.५० लाख रुपये रोख व दोन मनी काऊंटिंग मशीन जप्त करण्यात आल्या. ती संपूर्ण रक्कम आपण अमरावतीतूनच भरल्याची कबुली चालकांसह त्या दोघांनीदेखील दिली. या संपूर्ण कालावधीत ताब्यात घेतलेल्या सहाही जणांनी पोलिसांना फारसे सहकार्य केले नाही.  अगदी त्याच दिवशी प्रकरणाचे स्ट्रॉंग गुजरात कनेक्क्शन उघड झाले. पाठोपाठ हैदराबाद पोलिसांनी विचारणा केली. मात्र, या प्रकरणातील स्थानिक पाठराखे पडद्याआड राहिले. से दाखल केल्यानंतर पोलिसांची पुढील भूमिका ठरणार आहे. 

प्रकरण न्यायालयात अहमदाबाद स्थित नीना शहा यांनी ती रक्कम आपली असल्याचा दावा सीए, वकिलाकरवी केला. तिसऱ्या दिवशी हे प्रकरण स्थानिक न्यायालयात पोहोचले. ताब्यातील सहा जण चौकशीला सहकार्य करीत नसल्याने सखोल चौकशीशिवाय संबंधित कंपनीला ती रक्कम परत करू नये, असा अर्ज आयकर विभागाने न्यायालयात दाखल केला. पोलिसांचा अर्ज स्वीकारून ४ ऑगस्ट रोजी ‘से’ दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. 

‘से’ दाखल केल्यानंतर ठरेल तपासाची दिशायाप्रकरणात ‘से’ दाखल करण्यापुर्वी पोलिसांनादेखील आपली बाजू भक्कम करावयाची आहे. चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेल्या सहा जणांनी पैसा येथूनच भरला, मुंबई, औरंगाबाद जात होता, एवढीच कबुली दिली. मात्र, त्यापुढील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तपासाला परवानगी मिळाल्याने आता पोलीस त्या सहा जणांचे मोबाईल सीडीआर, स्थानिक संबंध व एकूणच प्रकरणाच्या तळाशी जाणार आहेत.

न्यायालयाने तपासाची परवानगी दिली आहे. ‘से’ दाखल करावयाचा आहे. रक्कम वैध होती, तर दडवून का नेत होते, हा आमचा प्रश्न असेल. - मनीष ठाकरे ठाणेदार, राजापेठ

 

टॅग्स :Policeपोलिस