लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे मद्यपानाची सवय अंगी बाळगणाऱ्या व्यक्तींना या सवयीला कुलूप लावावे लागले. मद्य न मिळाल्याने मद्यपान सोडल्याचे सांगत आहेत. मात्र, या बाबीच्या पुष्टीसाठी लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण होऊ द्यावा लागेल. दरम्यानच्या काळात कुटुंबाशी पुन्हा जुळण्याची संधी काहींना प्राप्त झाली आहे.शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अवैध देशी-विदेशी दारूची विक्री होत असते. पोलीस वारंवार या अवैध धंद्यांवर कारवाई करीत असतात. लॉकडाऊन व संचारबंदी यामुळे दारूची मागणी जास्त व पुरवठा कमी झाला. तथापि, सर्व ठिकाणचे काम-धंदे बंद असल्यामुळे लोकांकडे पैसा नाहीत. परिणामी जुगार, मटका खेळताना लोक दिसत नाहीत तसेच दारूविक्री होत नसल्यामुळे पिणारेही कमी झाले आहेत. विदेशी दारूचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला असल्यामुळे दारू पिणाºया शौकिनांना विदेशी दारू मिळत नाही.दारूविक्री करणाºया मंडळीचा धंदा लॉकडाऊनमुळे बसला असूृन, त्यांच्यावरसुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर जेवायला जायचे तर हॉटेल बंद आहेत. त्यामुळे घरातील जेवणाचा स्वाद अधिक रूचकर वाटू लागला आहे. कुटुंबामध्ये एकत्र बसून जेवणाची सवय तरुणाई अंगी बाणवून घेत आहे. घरच्या जेवणामुळे प्रत्येकाचे छोटे-मोठे आजार पळून गेले आहेत.कोरोनाच्या अनामिक भीतीने दुरावलेली नाती जवळ येत आहेत. घरामध्ये एकमेकांशी संवाद वाढला आहे. त्यामुळे समाधानकारक, प्रसन्न वातावरण कुटुंबात पाहायला मिळत आहे.माणूस म्हणून जगताना काय महत्वाचे, याची प्रत्येकाला जाणीव होत आहे. कोरोना जीवघेणा, मात्र भारतात कौटुंबिक आघाडीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.अन् घरातील वातावरणही पालटलेदारू, जुगार, मटका यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. त्याच्या परिणामी अनेक आत्महत्या निदर्शनास आल्या आहेत. दारूमुळे घरात सतत भांडण, तंटा होत असतो. संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात दारू मिळत नसल्याने अनेकांची दारू सुटली आहे. यामुळे वाद कमी होऊन संवाद वाढत चालला आहे. घरातील महिला आनंद व्यक्त करीत असून, घरातील वातावरणही पालटून गेले आहे.
मद्यपानाच्या सवयीला लॉकडाऊनमुळे कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:00 AM
शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अवैध देशी-विदेशी दारूची विक्री होत असते. पोलीस वारंवार या अवैध धंद्यांवर कारवाई करीत असतात. लॉकडाऊन व संचारबंदी यामुळे दारूची मागणी जास्त व पुरवठा कमी झाला. तथापि, सर्व ठिकाणचे काम-धंदे बंद असल्यामुळे लोकांकडे पैसा नाहीत. परिणामी जुगार, मटका खेळताना लोक दिसत नाहीत तसेच दारूविक्री होत नसल्यामुळे पिणारेही कमी झाले आहेत.
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम । कुटुंबातील वातावरण झाले सौख्यमय