लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या पश्चिमेकडील लालखडी परिसरातील अकबरनगर वॉटर सप्लाय येथे एका अवैध कत्तलखान्यात बाहेरून कुलूप अन् आत गोवंशाची कत्तल, असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. या नव्या शक्कलीमुळे पोलीस यंत्रणेला गुंगारा देण्याचा अफलातून प्रकार अवैध कत्तलखाना संचालकांकडून सुरू आहे.नागपुरी गेट पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या पशू वैद्यकीय विभागाने गुरूवार, १४ मार्च रोजी लालखडी भागात कत्तलीसाठी आणलेले ५२ गोवंश ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तेथील अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. तथापि, अवैध कत्तलखाने बंद असल्याचा देखावा लालखडी भागातील त्या संचालकाने चालविला आहे. खरे तर आतमध्ये या कत्तलखान्यांमध्ये गोवंशाच्या कत्तली सुरूच आहेत. दिवसा या अवैध कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांना बाहेरून कुलूप लावून आतमध्ये गोवंशाच्या कत्तली केल्या जात आहेत. त्यानंतर हे गोवंशाचे मांस रात्रीतून ट्रकद्वारे हैद्राबाद, मुंबईकडे पाठविण्याचा प्रकार सुरूच आहे. हे अवैध कत्तलखाने इर्शाद मुंशी नामक व्यक्तीचे असल्याची विश्वसनीय माहिती आहे.लालखडी बायपासवर ट्रकमध्ये भरतात मांसलालखडी अकबरनगरातील वॉटर सप्लाय येथे अवैध कत्तलखान्यात गोवंशाच्या कत्तली करून ते मांस बायपासवर ट्रकमध्ये भरून हैद्राबाद, मुंबईकडे ट्रकद्वारे पाठविले जाते. लालखडी भागात अवैध कत्तलखाने हे महापालिकेच्या अतिक्रमित जागेवर उभारण्यात आले आहे. पाच ते सहा अवैध कत्तलखाने सुरू असताना महापालिका, पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविले आहे. अवैध कत्तलखाने हटविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.चार दिवसांपूर्वी एका महिलेची पोलिसात तक्रारलालखडी भागातील अकबरनगरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याने या भागातील गरीब, सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. नाल्यांमध्ये रक्ताचे पाट वाहणे ही नित्याचीच बाब झाली आहे. महापालिका प्रशासनाने उभारलेले हातपंप हे नागरिकांना नव्हे तर अवैध कत्तलखान्यांसाठी वापरले जात आहे. याप्रकरणी शबाना बी नामक महिलेने बुधवार, १४ मार्च रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अवैध कत्तलखाने संचालकांविरूद्ध तक्रार नोंदविली आहे.
बाहेरून कुलूप अन् आतमध्ये गोवंशाची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:26 PM
शहराच्या पश्चिमेकडील लालखडी परिसरातील अकबरनगर वॉटर सप्लाय येथे एका अवैध कत्तलखान्यात बाहेरून कुलूप अन् आत गोवंशाची कत्तल, असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. या नव्या शक्कलीमुळे पोलीस यंत्रणेला गुंगारा देण्याचा अफलातून प्रकार अवैध कत्तलखाना संचालकांकडून सुरू आहे.
ठळक मुद्देअवैध कत्तलखाना संचालकांची शक्कल : लालखडी परिसरातील अकबरनगरात प्रकार