अनंत बोबडे येवदादर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील झगेश्वर महाराजांच्या मंदिरात गेल्या ३५० वर्षापासून रिंगणाच्या काट्यावरील लोटांगणाची परंपरा आजही कायम आहे. आजच्या विज्ञान युगात काट्यावरील लोटांगणाची प्रथा ही कुठलीही अंधश्रद्धा नसून या काट्यापासून एका आयुर्वेदिक संजिवनी मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. वडनेर गंगाई सतरा ते अठराशे लोकसंख्येचे गाव असून येथील ग्रामदैवत म्हणून श्री झगेश्वर महाराजांना मानतात. महाराजांनी या गावातील मंदिरात जिवंत समाधी घेतली आहे. रामनवमी व चैत्र एकादशीनिमित्त गावातील लोक गावाच्या शिवेवरून लोटांगण घेत मंदिरापर्यंत भजनाच्या गजरात येतात व सर्व भक्तगण आरती करून मंदिराच्या आवारात रिंगणाच्या काट्यावर लोटांगण घेण्याऱ्या व्यक्तीला शरीरावर ईजा झालेली दिसत नाही. रिंगणाच्या काट्यावर लोटांगण घेणारा पहिली व्यक्ती गोदांची भराटे हे होते. नंतर गावातील भक्तगण व लहान मुले यांनी ३५० वर्षापासून लोटांगण घेण्याची प्रथा सुरू ठेवलेली आहे. रात्रीच्या वेळी गावातून श्री झगेश्वर रथाची मिरवणूक काढली जाते. गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीतर्फे त्या रथाला नारळ अर्पण केले जाते. या धार्मिक उत्साहात गावातील सर्व धर्मातील लोक एकत्रित येतात. यामध्ये संजू मावळे, चंद्रशेखर हुतके, विजयराव देशमुख, मारोतीराव गाडखे, रमेशराव लिंगोट, पुरुषोत्तम डोईफोडे, गजानन बायस्कर, श्रीमती रत्नप्रभा वानखडे, प्रदीप देशमुख, रमेशराव जोध, राजू हुतके, सुधीर हुतके, दिनकरराव देशमुख व लोकांच्या सहकार्याने उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या संस्थानचे प्रमुख प्रवीण प्रभाकरराव लाजूरकर यांच्या मार्गदर्शनाखालील गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडतात. सर्व गाव महाराजांच्या नावाने उपवास करून बारसच्या दिवशी महाप्रसादच्या कार्यक्रमात उपवास सोडतात. येथील प्रतिष्ठीत नागरिक गजानन बायस्कर म्हणाले, आमच्या गावाची ही परंपरा अतिप्राचीन असून ही प्रथा आजही मोठ्या उत्साहात गावकरी साजरी करतात. त्यामुळे हा गाव झगेश्वर महाराजांच्या नावाने ओळखला जातो.
वडनेर गंगाईत भाविकांचे काट्यावरून लोटांगण
By admin | Published: April 01, 2015 12:23 AM