लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : नजीकच्या मोथा येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ वर्गापैकी दोनच वर्ग सुरू आहेत, तर इतर खोल्यांना कुलूप असते. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक बेपत्ता असल्याचा हा प्रकार निदर्शनास येताच गुरुवारी दुपारी १२ वाजता संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले व याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. नागरिकांच्या या पवित्र्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत मोथा केंद्रीय शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. केंद्रीय शाळेचा दर्जा असला तरी येथे सहा शिक्षक कार्यरत आहेत. गुरुवारी या सहा शिक्षकांपैकी अर्चना सोमवंशी आणि तिलोत्तमा देशमुख या दोनच शिक्षिका हजर होत्या, तर उर्वरित चार शिक्षक कुठे आहेत, याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. सहा वर्गखोल्या तसेच पोषण आहाराच्या खोलीला कुलूप होते.शिक्षक नसल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर मैदानात खेळत होते. हा प्रकार माहिती होताच सरपंच साबुलाल दहीकर, उपसरपंच जगत शनवारे, रमेश खडके, ज्ञानेश्वर निखाडे, नामदेव पाटील, नामदेव निखाडे, तेजुराम खडके, बंडू निखाडे आदींनी भेट दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता, चार शिक्षक शाळेत न आल्याने वर्गखोल्या बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त पदाधिकाºयांनी थेट शाळेला कुलूप ठोकले आणि गटविकास अधिकारी ए.एन. अलोने यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.जोपर्यंत शिक्षक देत नाही, तोपर्यंत बेमुदत ‘ताला ठोको’ आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला.सरपंच आणि गावकऱ्यांसह गुरुवारी शाळेला भेट दिली असता, आठपैकी सहा वर्गांना कुलूप होते. चार शिक्षक हजर नव्हते. या शाळेला शिक्षक दिले जात नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा निर्णय गावकºयांनी घेतला आहे.- जगत शनवारे,उपसरपंच, मोथापाठोपाठ दोन प्रशिक्षण असल्याने मोथा येथील शिक्षक, मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. यासंदर्भात संबंधितांना माहिती देण्यात आली आहे. लवकरच शिक्षक परत पाठविण्यात येतील.- संदीप बोडखे, गटशिक्षणाधिकारी,चिखलदरा
मोथा ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:44 PM
नजीकच्या मोथा येथील जिल्हा परिषद शाळेतील आठ वर्गापैकी दोनच वर्ग सुरू आहेत, तर इतर खोल्यांना कुलूप असते. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षक बेपत्ता असल्याचा हा प्रकार निदर्शनास येताच गुरुवारी दुपारी १२ वाजता संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच कुलूप ठोकले....
ठळक मुद्देविद्यार्थी वाऱ्यावर : शिक्षक बेपत्ता, आठपैकी दोन वर्ग सुरू