लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले. याउलट अॅपची स्थिती आहे. सी-व्हिजीलवर २३ दिवसांत २७ तक्रारी दाखल झाल्यात. मात्र, सुगम, सुविधा अन् समाधान हे अॅप मतदारांनी दुर्लक्षित केले आहेत.मतदान केंद्रातील यादीत नाव नसणे, चुकीचे असणे, पत्त्यात बदल यांसारख्या अनेक अडचणी मतदारांना येतात. यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात २५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत या क्रमांकावर ११५८ मतदारांनी कॉल करून शंकांचे निरसन करून घेतले. यामध्ये सर्वाधिक कॉल अमरावती व बडनेरा येथून आले असल्याची माहिती आहे. मतदार याद्या बिनचूक व्हाव्यात, यासाठी ही सुविधा देण्यात आली. मतदार यादीत नाव आहे काय, असल्यास नाव बिनचूक आहे काय, यासाठी ही टोल फ्री सुविधा उपलब्ध आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत ही सेवा सुरू राहते. निवडणूक जाहीर झाल्यापासून या क्रमांकावरील कॉलची संख्या वाढली आहे. अनेकदा या क्रमांकावर मार्गदर्शन मागितले जाते. यामध्ये नाव-पत्त्यात बदल, चुकलेला फोटो बदलणे, मतदान केंद्र याबाबत काय करावे, हा रोख प्रामुख्याने असतो. प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात असल्याने या क्रमांकावर अलीकडे येणारे कॉलची संख्या देखील वाढली आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांद्वारा यादीचा क्रमांक, मतदार क्रमांकाच्या विषयीचे अधिकाधिक कॉल येत आहेत.१७ तक्रारी पडताळणीअंती रद्दआचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सामान्यांना तक्रार करता यावी, त्यांची ओळख पुढे येऊ नये, यासाठी आयोगाद्वारे यंदा सी-व्हिजिल अॅप तयार करण्यात आले. या अॅपवर आतापर्यंत २७ तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी १७ तक्रारी पडताळणीअंती रद्द करण्यात आल्यात. आठ तक्रारी बाद करण्यात आल्यात, तर दोन तक्रारी चौकशीसाठी सबंधिताकडे पाठविण्यात आल्याची माहिती या कक्षाने दिली.‘एनजीएसपी’वर तक्रारी निरंकउमेदवारांना घरबसल्या अर्ज भरता यावा, यासाठी नॅशनल निव्हिनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने उमेदवारांना सुविधा देण्यात आली. मात्र, एकाही उमेदवाराने या पोर्टलचा वापर केलेला नाही. सुविधा अॅप या उमेदवारांसाठी असलेल्या एक खिडकीला त्यांचा प्रतिसादच नाही. वाहनांच्या परवानगीसाठी सुगम अॅप सुरू केले असले तरी अद्याप उमेदवारांनी या अॅपमध्ये स्वारस्य दाखविलेले नाही.
Lok Sabha Election 2019; हेल्पलाईनवर ११५८ कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 1:14 AM
लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांक, मतदान केंद्र शोधताना त्रास होऊ नये, यासाठी पाच महिन्यांपासून टोल फ्री क्रमांकाची सुविधा देण्यात आली. यावर तब्बल ११५८ मतदारांनी संपर्क साधला व शंकांचे निरसन केले.
ठळक मुद्देटोल फ्री क्रमांकाला प्रतिसाद : सी-व्हिजिलला २७; इतर अॅपवर प्रतीक्षाच