लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजित बंदोबस्तात २७ केंद्रीय, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथके व एक जलद प्रतिसाद पथकही सज्ज आहे.शहर पोलीस आयुक्तालयात ७६६ मतदान केंद्रे आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात तीन पोलीस आयुक्त, आठ उपायुक्त, ३८ निरीक्षक, ११२ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक आणि सुमारे १९५० पोलीस कर्मचारी, सोबतच ५०० होमगार्डचा बंदोबस्त त्यावर राहणार आहे. या बंदोबस्ताच्या मदतीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी व राज्य राखीव पोलीस दलाच्या २ कंपन्या असा एकूण ३५० सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. त्यांच्या दिमतीला २४२ वाहनांचा प्रचंड ताफा असणार आहे.या क्रमांकावर करा संपर्कपोलीस उपायुक्त यशवंत सोळके यांच्या नियंत्रणाखालील रात्रगस्तीची पथक काम करणार आहेत. यादरम्यान अनुचित प्रकाराची तक्रार सोळंके यांच्या ९८२३५१५८०० या क्रमांकावर तसेच पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी (९९२३४००९५१), विजय वाकसे (९९२३२५२६९६), आसाराम चोरमले (९९२३२६४४१२), गुन्हे शाखेचे पीआय कैलास पुंडकर (९३०९८३५३३१), सपोनि दत्ता देसाई (८००७११११३७) व पीएसआय आशिष देशमुख (९६६५१८३५३७) या क्रमांकावर सपर्क करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.३२ पोलीस सेक्टर पेट्रोलिंगमहसूल विभागाचे ६४ झोनल अधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस ताफ्याव्यतिरिक्त ३२ पोलीस सेक्टर पेट्रोलिंग करणार आहेत. १२ पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिपत्याखालील पेट्रोलिंग पथके, १८ बिट मार्शल व महिला पेट्रोलिंग पथक बंदोबस्तासाठी नेमलेले आहे. त्यांच्या दिमतीला या व्यतिरिक्त २७ केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्या, २ दंगा नियंत्रण पथके (आरसीपी) व १ जलद प्रतिसाद पथक नेमण्यात आले.रात्रदिवस तैनातगुन्हे शाखा, विशेष शाखा व पोलीस उपायुक्तांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली असलेली विशेष पथके रात्रंदिवस तैनात राहणार आहे. समाजकंटक व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे, अवैध दारू व पैशांच्या वाटपावर ही पथके लक्ष ठेवणार आहेत. रात्रगस्तीदरम्यान फ्लाइंग स्कॉड, एसएसटी व व्हीएसटी याशिवाय पोलीस आयुक्तांनी ३० व्हिडीओ ग्राफर असलेली ३० पथके तैनात केली.
Lok Sabha Election 2019; ३५० सशस्त्र पोलीस जवानांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:12 AM
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजित बंदोबस्तात २७ केंद्रीय, तर राज्य राखीव पोलीस दलाच्या २७ सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथके व एक जलद प्रतिसाद पथकही सज्ज आहे.
ठळक मुद्देआयुक्तालयात ७६६ मतदान केंद्रे : केंद्रीय, राज्य दलाचा ताफा