लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद अपंग बालगृहातील ४८ मुलांनी गुरुवारी वझ्झर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.शंकरबाबा पापळकर यांनी राज्याच्या कानाकोपºयात बेवारस मिळालेल्या या मुलांना बालगृहात आणून त्यांचा सांभाळ केला. शंकरबाबा अनेक वर्षांपासून या मुलांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाशी झगडत आहेत. त्यानुसार त्या निराधार मुलांना वडील म्हणून शंकरबाबा पापळकर यांचे नाव मिळाले. दुसरीकडे आधार कार्ड काढून त्यांचे नाव मतदान यादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. ४८ पैकी १५ मुलांना यापूर्वीच मतदानाचा अधिकार मिळाला होता. या बालगृहात एकूण १२३ मुले-मुली आहेत.तुम्ही मतदान कराआम्ही अंध, अपंग, गतिमंद असूनही आम्ही मतदान केले. त्यानुसार कुण्याही मतदाराने घरात बसून न राहता देशाच्या या सर्वात मोठ्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन शंकरबाबांच्या या मुलांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. तर मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याचा आनंद असून, त्यांच्या पुनर्वसनाचा कायदासुद्धा शासनाने लवकर करावा, अशी मागणी शंकरबाबांनी केली.
Lok Sabha Election 2019; शंकरबाबांच्या ४८ मुलांनी केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:49 AM