शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
2
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
3
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
5
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
6
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
7
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
8
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
9
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
10
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
11
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
12
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
13
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
14
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
15
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
16
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
17
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
18
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
19
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
20
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार

Lok Sabha Election 2019; ५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:12 AM

नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले.

पाच तालुके : नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदानवर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले. उशिरा रात्रीपर्यंत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मुख्यालयी पोहोचले नसल्याने पाच वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानावर सरासरी मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.नांदगाव तालुक्यात मतदारांचा उत्साहनांदगाव खंडेश्वर : वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडण्यासाठी गुरुवारी झालेल्या मतदानाकरिता मतदारांनी कमालीचा उत्साह आढळून आला. सकाळी १० वाजता मतदान केंद्रावर मतदाराच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुपारच्या रखरखत्या उन्हात काही ठिकाणी मतदारसंख्या रोडावली. मात्र, उन्ह उतरल्यानंतर पुन्हा एकदा रांगा लागल्या. नांदगाव शहरात ११ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते ११ या चार तासात सुमारे १४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील विविध गावांमध्येही मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. येथील २४७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. पण, अवघ्या काही मिनिटांतच ती झोनल आॅफिसरने दूर केली. गोंधळ न होता तेथील मतदान पूर्ववत सुरू झाले. २४९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांच्या टेबलवरील पंखा बंद होता.गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदार यादीत नावच नसल्याने जवळपास तीनशे मतदारांना परत जावे लागले. गत निवडणुकीत मतदान करूनही आपले नाव बेपत्ता झाल्याने या मतदारांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.धामणगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या अभिरुप चाचणीत ईव्हीएममध्ये बिघाड आल्याचे लक्षात आल्याने. धानोरा शिक्रा, सातरगाव, टाकळी, दहेगाव, शिवणी रसुलापूर येथील मशीन बदलविण्यात आल्या.शहरातीलच ८९ क्रमांकाच्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम दीड तास बंद राहिल्याने मतदान खोळंबले. दीड तासाने मतदान सुरू झाले. मशीन बदलविण्यासाठी तब्बल दीड तास वेळ झाल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.एरवी प्रत्येक निवडणुकीत शतप्रतिशत मतदान व्हावे, यासाठी राजकीय कार्यकर्ते, त्यातही तरुण आघाडीवर असतात. मात्र, गुरुवारी तालुकाभर हे चित्र कुठेही दिसले नाही. मतदानाचा टक्का घसरल्याची चर्चा परिसरात पाहायला मिळाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019