शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

Lok Sabha Election 2019; यंदा सखी मतदान केंद्राची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:46 PM

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहिलांचा टक्का वाढविणार : महिलाच चालविणार मतदान केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे सखी मतदान केंद्रे’ म्हणून ओळखली जाणार आहेत.लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र राहणार असून, याला ‘सखी मतदान केंद्र’ असे म्हटले जाणार आहे.महिलाशक्ती निर्णायकयंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदार दरहजारी ८८९ वरून ९११ झाल्या आहेत. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ८८९ इतके होते. आता मात्र सन २०१९ या प्रमाणात एक हजार पुरुषांमागे ९११ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.केंद्राच्या रंगरंगोटीसह सफाईवर लक्षसर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या मतदान केंद्रात तैनात महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात.महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यावर भर‘सखी मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सखी मतदार केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा ठिकाणी केंद्राची निवड करण्यात येणार आहे.