लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेना-भाजपचाच खासदार निवडून यायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी अचलपूर येथील सभेत केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अमरावतीसारख्या विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात भाजप-शिवसेना उमेदवाराविरोधात उभा करायला पक्षातील योग्य कार्यकर्ता मिळत नाही; त्यांना हंगामी उमेदवाराला उभे करावे लागते, यातच त्यांच्या पराभूत मानसिकतेचा परिचय येतो, असे अहीर म्हणाले. मेळघाटच्या विकासाकरीता मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या. पूर्वी मेळघाटात अंधाराचे साम्राज्य होते; परंतु धारणी तालुक्यात स्वतंत्र विद्युत उपकेंद्राची निर्मिती केली. चिखलदरा येथे पर्यटकांसाठी स्कायवॉक निर्माण करण्याचे काम सुरू आहे. थेट अमरावती शहरापासून मध्य प्रदेशपर्यंत चारपदरी मार्ग निर्मिती व तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे आगामी काळात मेळघाटचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासोबत अनेक योजना कार्य$ान्वित होणार असल्याचे ना. अहीर म्हणाले.चांगले परिणाम दिसण्यासाठी मोदी सरकारला आणखी अवधी देणे आवश्यक आहे. कारण अनेक योजना तयार असून, त्यांचे कार्यान्वयन तेवढे बाकी आहे. तापी नदीजोड प्रकल्पाबाबत कोणताही अभ्यास नसलेले उमेदवार आदिवासी बांधवांचे माथे भडकविण्याचे काम करीत आहेत. हा प्रकल्प आदिवासी बांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारा आहे. सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी मिळणार असल्याने आदिवासी बांधव बागायती शेती करू शकतील. अमरावती जिल्ह्यात दूरपर्यंत या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. ही सर्व विकासकामे होत असल्याने आनंदराव अडसूळ यांना संसदेत पाठविणे आवश्यक असल्याचे ना. अहीर म्हणाले.
Lok Sabha Election 2019; मेळघाटच्या विकासाकरिता युतीचा खासदार हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:43 PM
मेळघाटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेना-भाजपचाच खासदार निवडून यायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी अचलपूर येथील सभेत केले.
ठळक मुद्देहंसराज अहीर : अचलपूरच्या सभेत नागरिकांना आवाहन