लोकमत न्यूज नेटवर्कधूळघाट : मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धूळघाट रेल्वे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवसाआधी समस्यांची सोडवणूक न झाल्यास गावातील एकही मतदार मतदान करणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला. तालुका मुख्यालयापासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धूळघाट रेल्वे येथे मुलभूत सुविधांची वाणवा आहे.निवेदनानुसार, शासनाने जानेवारी २०१७ पासून अकोला- धूळघाट रेल्वे-महू ही रेल्वे सेवा बंद केली. ही रेल्वे सेवा बंद करण्याआधी हिवरखेड ते धूळघाट रेल्वे हा रहदारीचा रस्ता उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे अकोला, अकोट व अन्य ठिकाणी ये-जा करणे धूळघाटसाठी कसरतीचे ठरले आहे. रेल्वे क्रॉसिंगवरून विद्युत पुरवठा करण्यास शासनाने नकार दिल्याने येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. धूळघाट रेल्वे ग्रामस्थ वनविभागांतर्गत येणाऱ्या हिवरखेड ते धूळघाट रेल्वे या कच्च्या मार्गावरील गेट सायंकाळी ६ वाजतानंतर वनविभागाकडून बंद केले जाते. त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना गेटवरच थांबावे लागते. ही वेळ रात्री १० करण्यात यावी, या मागण्या धूळघाट रेल्वे येथील गावकºयांनी शासनाकडे केल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा सरपंच रामा भिलावेकर, चंद्रशेखर सपाटे, विष्णू भिलावेकर, रामेश्वर कास्देकर, नारायण माकोडे यांनी इशारा दिला आहे.प्रत्येक मतदाराने मतदान करावे. बहिष्कार टाकू नये. समस्या निवारणासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.राहुल जाधव, उपविभागीय अधिकारी धारणीआम्ही मुख्य प्रवाहापासून लांब आहोत. संपुर्ण गावाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनास १८ एप्रिलपर्यंत वेळ दिला आहे.- रामा भिलावेकर, सरपंच
Lok Sabha Election 2019; धूळघाट रेल्वे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 10:42 PM
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धूळघाट रेल्वे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवसाआधी समस्यांची सोडवणूक न झाल्यास गावातील एकही मतदार मतदान करणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला. तालुका मुख्यालयापासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धूळघाट रेल्वे येथे मुलभूत सुविधांची वाणवा आहे.
ठळक मुद्दे१८ एप्रिलची डेडलाईन : मूलभूत सुविधांची वानवा