शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

Lok Sabha Election 2019; नांदगाव खंडेश्वरने देशाला दिले पहिले कृषिमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:35 PM

डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला.

ठळक मुद्देसर्वाधिक मताधिक्याचा विक्रमविरोधकांना प्रचारस्थळी पोहचवणारे डॉ. पंजाबराव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: डॉ. भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्या रूपाने स्वतंत्र भारताला पहिले कृषिमंत्री देण्याचा बहुमान नांदगाव खंडेश्वर तालुक्याला मिळाला. एवढेच नव्हे तर १९५२ व १९५७ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावे नोंदविला गेला आहे.१९५७ च्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण २ लाख ५२ हजार ७६४ मतदान झाले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १ लाख ५७ हजार ५२३ मते (६२.३२ टक्के) पडली होती. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात इतर पाच उमेदवार होते. यात डॉ. मशानकर यांना २६ हजार ५३१ (१०.४४ टक्के), अण्णा मडघे यांना २० हजार ८९८ (८.२६ टक्के), अडसड यांना २० हजार १४ (७.९१ टक्के), संघई यांना १७ हजार ३७९ (६.८९ टक्के), तर पोतदार यांना १० हजार ४१ (४.१२ टक्के) मते मिळाली होती.१९६२ ची लोकसभा निवडणूक जिंकून भाऊसाहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला हा नेता दिल्लीच्या राजकारणातही वरचढ होता. १९५२ ते १९५६ या काळात ते भारताचे पहिले कृषिमंत्री व १९५७ ते १९६२ पर्यंत सहकारमंत्री होते. १९६२ च्या मंत्रिमंडळात समावेश होऊ न देण्याचा हितशत्रूंचा डावपेच मात्र यशस्वी ठरला. तथापि, पहिल्या दोन निवडणुकांतील मताधिक्याचा विक्रम व डॉ. पंजाबराव देशमुखांचा सामाजिक कार्याचा ठसा जनमानसावर कायम आहे.

प्रचारासाठी एकच वाहनप्रचारकार्याचा एवढा तामझाम नव्हता. एकच वाहन प्रचाराला होते. ज्या भागात प्रचार असला, त्या भागातील कार्यकर्ते घेऊन प्रचार सभा घेण्यात येत होती. स्थानिक कार्यकर्तेच प्रचार करीत असत. अलीकडच्या काळात शक्तिप्रदर्शनासारखे काहीही त्यावेळी नव्हते. सभेला माणसे आणली जात नव्हती, तर स्वत:हून लोक येत असत. १९५२ ला देशातून सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यानंतर भाऊसाहेबांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. त्या घटनेचे त्यांचे भाचे दिवंगत जानराव देशमुख (सोळंके) हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.

विरोधकांना बसविले वाहनात१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पंजाबराव देशमुख प्रचारार्थ निघाले असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे वाहन वलगावनजीक पंक्चर झाल्याचे आढळले. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत घेऊन नियोजित प्रचार सभेला पोहचवून दिले. एवढ्या विशाल हृदयाचा व निर्मळ अंत:करणाचा नेता दुर्मीळच!

पत्नीऐवजी पक्षासाठी मते१९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते, तर त्यांच्या पत्नी विमलाबाई विधानसभेसाठी अपक्ष उभ्या होत्या. दोन्ही निवडणुका त्यावेळी एकत्रच होत असत. भाऊसाहेब पत्नीच्या प्रचारसभेला गेले नाहीत वा त्यांच्यासाठी मतदारांकडे मते मागितल्याचे ऐकिवात नाही; उलट विधानसभेतही काँग्रेसच्या उमेदवाराला मते द्या, असे ते सांगायचे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक