लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नैसर्गिक संकट, सततची नापिकी, बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट तयार करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करू, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी साऊर येथील जाहीर सभेत व्यक्त केला.नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडली. शेतकरी चहूबाजूने खचत चालला आहे. शेतकºयांच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी हताश झाला आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना न्याय देण्यासाठी शेतकºयांकरिता स्वतंत्र बजेट तयार करावे, अशी आग्रही मागणी खासदार झाल्यानंतर केली जाईल. ‘शेतकरी सुखी तर नागरिक सुखी’ याअनुषंगाने स्वतंत्र बजेट तयार करून बळीराजाच्या जीवनात आनंदाची पहाट आणू, असा विश्वास त्यांनी दिला. शेतीपूरक उद्योग, सिंचन सुविधा, शेतीमालाला योग्य भाव आदी विषय प्रकर्षाने संसदेत मांडले जातील. वलगाव येथे स्वतंत्र तहसील निर्मितीसाठी शासनाकडे साकडे घातले जाणार आहे. मी अमरावतीच्या मातीशी एकरूप असून, या मातीचे ईमान राखणे हे माझे कर्तव्य असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी दिली. साऊर येथील गरीब, सामान्यांना घरकुल मिळेल. गावातील रस्ते, समाजमंदिर, विहारांची निर्मिती, नाना-नानी पार्क, गावात फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासिका साकारली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.यावेळी काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई बोंडे, रिपाइं (गवई गट)चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड, अजीज पटेल, जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, प्रकाश बोंडे, अभिजित देवके, जितू दुधाने, नरेंद्र तेलखडे, भातकुली तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले आदी उपस्थित होते. जाहीर सभेला झालेल्या गर्दीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.रहाटगाव - शेगाव नाका येथे जाहीर सभानवनीत राणा यांच्या प्रचारार्थ रहाटगाव - शेगाव नाका येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी नवनीत राणा यांनी अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा महासंकल्प करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तत्पूर्वी ‘रोड-शो’, मतदारांच्या भेटीगाठींनी परिसर दणाणून गेला होता. महानगरात प्रत्येक प्रभागाचा कायापालट केला जाईल. नांदगाव पेठ एमआयडीसीत सर्वसामान्य, महिला, तरूण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. क्रीडांगणे, उद्याने व हक्काच्या घरांसाठी पीआर कार्ड, घरकुलाचा लाभ दिला जाईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी दिला.आम आदमी पार्टीचा नवनीत राणांना पाठिंबाअमरावती : आम आदमी पार्टी जिल्हा व शहरच्यावतीने सोमवारी पत्रपरिषद घेऊन महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दर्शविला. पार्टीने त्या संदर्भाचे पत्रही जारी केले. तसेच नवनीत राणा यांना निवडून आणण्याचा संकल्पसुद्धा यावेळी करण्यात आला. धर्मांध शक्तींना राजसत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. तरच भारतात संविधान अबाधित राहील, असा मजकूर जाहीर पाठिंब्याच्या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेटची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 1:19 AM
नैसर्गिक संकट, सततची नापिकी, बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट तयार करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करू, असा निर्धार अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी साऊर येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
ठळक मुद्देनवनीत राणा यांचा निर्धार : साऊर येथील महाआघाडीच्या जाहीर सभेत प्रचंड गर्दी