शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

Lok Sabha Election 2019; पारा ४१, मतदान ६१%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:49 AM

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

ठळक मुद्देअवकाळीपासून दिलासा, लग्नसराईचा फटका : सकाळी अधिक, दुपारनंतरही वाढला टक्का

अमरावती : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने दिलासा दिला. उन्हाचा पारा गुरुवारी ४१ पार झाल्याने दुपारी मतदानात शिथिलता आली. मात्र, सकाळी व दुपारी ही तूट भरून निघाली. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. मेळघाटातून आकडेवारी मिळायला उशीर झाल्याने टक्केवारीत काहीशी तफावत असू शकेल, अशी माहिती प्रशासनाने दिली.अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी अंतिम दिवशी ही लढत महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा व महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ या गतवेळच्या प्रतिस्पर्ध्यांमध्येच झाली. रिंगणात २४ उमेदवारांसह ‘नोटा’ असल्याने यंदा दोन इव्हीएमचा वापर करावा लागला.सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्याचे ४५ मिनिटांपूर्वी मॉक पोल घेण्यात आला. याला बहुतांश उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. मात्र, किमान ४० ते ५० मशीन मतदान प्रक्रियेत बंद पडल्या. त्यामुळे झोनल अधिकाऱ्यांनी येऊन तातडीने राखीव व्हीव्हीपॅट लावल्या. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्यादेखील तक्रारी आहेत. नेहमीप्रमाणेच या निवडणुकीतदेखील मतदार यादीत नाव नसणे, प्रभाग बदलणे आदी प्रकार झाल्याने निवडणूक यंत्रणेची पोलखोल झाली.निवडणुकीत एकूण १८ लाख ३० हजार ५६१ मतदार आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच सकाळी ७ ते ९ दरम्यान मतदारांचा उत्साह नव्हता. या वेळात १ लाख २५ हजार ४८१ मतदान झाले. यात ८६ हजार ९९ पुरुष व ३९ हजार ३८१ स्त्री मतदारांनी सहभाग नोंदविला. ही टक्केवारी ६.८५ आहे. त्यानंतर सकाळी ११ पर्यंत २ लाख १९ हजार ५६४ पुरुष व १ लाख ३७ हजार १६७ स्त्री अशा एकूण ३ लाख ५६ हजार ७३३ मतदारांनी सहभाग नोंदविला. ही टक्केवारी १९.४९ आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३ लाख ४९ हजार ८५० पुरुष व २ लाख ६७ हजार ५४८ स्त्री मतदारांचे मतदान झाले. ही टक्केवारी ३३.७३ आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत थोडी शिथिलता आली. यावेळी ४ लाख ५४ हजार ८९३ पुरुष व ३ लाख ७७ हजार ४७१ स्त्री अशा एकूण ८ लाख ३२ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क नोंदविला. ही ४५. ४७ टक्केवारी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ लाख ४७ हजार ४५६ पुरुष व ४ लाख ६४ हजार ३८१ स्त्री अशा एकूण १० लाख ११ हजार ८४० मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५५.२७ आहे. मात्र, ५ नंतर काही केंद्रांवर गर्दी वाढल्याने वेळेच्या आत मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या.मतदानानंतर बॅलेट युनिटचे छायाचित्र फेसबूकवरमतदान करताना बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी मतदानादरम्यान अमरावती शहरात घडला. बहुतांश मतदान केंद्रांवर सर्रास मोबाइलचा वापर झाल्याचे आढळून आले. त्याचा दुरुपयोगही काही जणांनी केला. मतदान करतेवेळी बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचे छायाचित्र काही मतदात्यांनी काढल्याचे या व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून निदर्शनास येत आहे. एका फेसबूक खात्यावर बॅलेट युनिटचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले. यात आनंदराव अडसुळ यांच्या ‘धनुष्यबाणा’ला मतदान केल्याचे दिसून येत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर व्हीव्हीपॅटचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ‘पाना’ हे चिन्ह असल्याचे चिठ्ठीत दिसून येत आहे. त्याची पडताळणी व चौकशी करण्याचे आश्वासन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील म्हणाले.नवनीत राणा यांच्या चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’मतदान केंद्राबाहेरील नोटीस बोर्डवर लावलेल्या डमी बॅलेटवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणूक चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’ नमूद केल्याचे आढळून आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाºयाच्या कृतीने काही मतांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार युवा स्वाभिमान पार्टीचे उमेश ढोणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदात्यांना उमेदवारांची नावे व चिन्हांची माहिती व्हावी, यासाठी सर्व मतदान केंद्रांबाहेर असलेल्या नोटीस बोर्डावर बनावट (डमी) बॅलेट लावण्यात आले. मात्र, शहरातील काही मतदान केंद्रांवर महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या नावासमोर व चिन्हासमोर ‘कॅन्सल्ड’ नमूद केल्याचे आढळले. मतदारांनीही याबाबत चीड व्यक्त केली. दरम्यान, ती डमी असल्याने ‘कॅन्सल्ड’ नमूद करून फुली मारली जाते. एआरओ ही कार्यवाही करतात. ती येऊ शकतो, अशी माहिती शरद पाटील यांनी दिली.आनंदराव अडसुळांविरुद्ध आचासंहिता भंगचा गुन्हाभाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री नोंदविण्यात आला. युतीच्या राजकमल चौकातील प्रचार कार्यालयावरील होर्डिंग काढले नसल्याची तक्रार भरारी पथकाचे नितीन बाबाराव उंडे यांनी कोतवाली पोलिसांत नोंदविली होती. भरारी पथक बुधवारी सायंकाळी राजकमल चौकातून जात असताना, त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार कार्यालयावर होर्डिंग दृष्टीस पडले. हे आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019