लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले.महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मंचावर देवीसिंह शेखावत, अरुण गुजराथी, राजेंद्र गवई, अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, आमदार रवि राणा, शरद तसरे, वसुधा देशमुख, केवलराम काळे, राजकुमार पटेल, सुरेखा ठाकरे, पुष्पाताई बोंडे, बबलू देशमुख, सुनील वºहाडे आदी उपस्थित होते.सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश पत्रपरिषद भरवतात. रिझर्व्ह बँकेतील हस्तक्षेपामुळे गव्हर्नर राजीनामा देतात. सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या घरच्या बैठकीतून रात्री दोन वाजता बदली केली जाते. राज्यघटना बदलण्याची भाषा वापरली जाते, ही देशावरील संकटेच होय.मोदी, फडणवीस म्हणतात - गांधी घराण्याने देशासाठी काय केले? गर्भश्रीमंत असताना जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. या देशातल्या गरीब माणसाची गरिबी घालविण्यासाठी इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला. त्यांना जगण्याची हिंमत आणि किंमत दिली. पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून थेट बांग्लादेशाची निर्मिती केली. इतिहास नव्हे, भूगोल निर्माण केला. तुमच्या खिशातील मोबाईल ही राजीव गांधी यांची देण. मोदींनी सत्ता मिळाल्यावर काय केले, असा सवाल पवार यांनी विचारला.रवि राणा आणि नवनीत राणा यांनी प्रभावी भाषण केले. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, सुनील वºहाडे यांची यावेळी भाषणे झाली. नवनीत यांना निवडून आणण्याचा शब्द प्रत्येकाने दिला.कुठे आहे तुमची५६ इंच छाती?जिनिव्हा करारानुसार कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले. अभिनंदनच्या शौर्याचा राजकीय लाभ घेऊ नका, असे त्याच्या मातापित्यांना सांगावे लागले. ५६ इंच छाती दाखविणाऱ्या मोदींनी पाकिस्तानात अडकलेल्या कुलभूषण जाधवांना का सोडवले नाही, कुठे गेली त्यांची ५६ इंच छाती, असा रोखठोक सवाल पवारांनी केला.अनिल देशमुखांनीसादर केले पुरावे!अनिल देशमुख यांनी ‘राज ठाकरे स्टाईल' भाषण करून रंगत आणली. मोदी किती खोटारडे आहेत, याचे पुरावेच त्यांनी 'डिजिटल स्क्रिन'वर सादर केलेत. हा सूर्य आणि हा जयद्ररथ, असेच ते सारे असल्यामुळे श्रोत्यांच्या मनाचा ठाव त्यांनी घेतला. शरद पवार यांनी देशमुखांच्या त्या सादरीकरणाचे कौतुक केले.
Lok Sabha Election 2019; मोदी हे संकट नव्हे ती तर राष्ट्रीय आपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:33 PM
देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे संकट नव्हे, तर राष्ट्रीय आपत्ती असल्याचे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येथे केले. महाआघाडी समर्थित अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ठळक मुद्देशरद पवार : इंदिरा गांधींनी निर्माण केला भूगोल