लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रचाराच्या दुसºया टप्यातील निवडणूक खर्च सादर केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी १२ लाख ८९ हजार ४७० रुपये खर्चाचा हिशेब सादर केला. त्या खर्चाबाबत आघाडीवर आहेत.बसपाचे उमेदवार अरुण वानखडे यांनी ११ लाख ४८ हजार १०० रुपये खर्च सादर केला. ते दुसºया स्थानी आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी १० लाख ४५ हजार ६८२ रुपये निवडणूक खर्च केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी केवळ २ लाख ६२ हजार ९४७ रुपये खर्च केले आहेत.सर्वात कमी खर्च सादर करणाऱ्यांमध्ये राजू मानकर आणि अनिल जामनेकर या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी १२ हजार ५०० रुपयांचा खर्च दर्शविला आहे.उल्लेखित प्रमुख चार उमेदवारांचा खर्च हा लाखांच्या घरात असताना इतर उमेदवारांचा आतापर्यंतचा निवडणूक खर्च हजारांच्या घरातच असल्याचे निवडणूक खर्च विभागाच्या माहितीपत्रावरून दिसून येते.लोकसभा लढवित असलेल्या उमेदवाराने निवडणूक कालावधीत होणाºया प्रत्येक खर्चाचा तपशील पुराव्यानिशी (पावती) निवडणूक खर्च कक्षाला सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील खर्चाचा हिशेब २४ उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाकडे सादर केला आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे.उमेदवारांना हिशेब सादर करण्यासाठी निवडणूक खर्च विभागाने तयार केलेल्या नियोजनानुसार २४ उमेदवारांचे प्रत्येकी आठ याप्रमाणे अ, ब, क असे तीन गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार दुसºया टप्प्यातील निवडणुकीचा खर्च उमेदवारांनी सादर केला आहे.उर्वरित २० उमेदवारांचा निवडणूक खर्चनीलिमा भटकर १ लाख ६० हजार ८९९, संजय आठवले १ लाख २० हजार ७४०, पंचशीला मोहोड ७७ हजार ४४०, पंकज मेश्राम ७३ हजार ४४७, ज्ञानेश्वर मानकर ४९ हजार ५५०, मीनाक्षी करवाडे ३७ हजार ९३५, राहुल मोहोड ३७ हजार २५०, अंबादास वानखडे २४ हजार ९१, प्रमोद मेश्राम २२ हजार ५००, विनोद गाडे २० हजार ५०, नरेंद्र कठाणे १८ हजार ६००, श्रीकांत रायबोले १६ हजार ९५०, राजू सोनोने १५ हजार ९४०, विलास थोरात १४ हजार ५५१, राजू जामनेकर १३ हजार ४५०, प्रवीण सरोदे १३ हजार ३०, नीलेश पाटील १२ हजार ६००, विजय विल्हेकर १२ हजार ६००, अनिल जामनेकर १२ हजार ५०० आणि राजू मानकर १२ हजार ५०० रुपये याप्रमाणे खर्च सादर केला आहे.सहा उमेदवार लाखांत, इतरांचा खर्च हजारांतलोकसभा निवडणूक लढवित असलेल्या २४ उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाकडे सादर केलेल्या खर्चाचा अहवालानुसार, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सहा जणांनी १२ लाखांपर्यत निवडणुकीत खर्च केल्याचे दिसून येते. मात्र, उर्वरित १८ अपक्ष उमेदवारांचा खर्च हा हजारांच्या घरात असल्याचे आकडेवारीवरू न स्पष्ट होते.
Lok Sabha Election 2019; निवडणूक खर्चात नवनीत आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:47 AM
लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रचाराच्या दुसºया टप्यातील निवडणूक खर्च सादर केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी १२ लाख ८९ हजार ४७० रुपये खर्चाचा हिशेब सादर केला. त्या खर्चाबाबत आघाडीवर आहेत.
ठळक मुद्देअपक्षांचा हात आखडता : पाठोपाठ वानखडे, अडसूळ तिसरे