शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

Lok Sabha Election 2019; लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:13 PM

लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशैलेश नवाल : दोन हजार केंद्रात १८,३०,५६१ मतदार बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ९,३३,४४४ पुरुष, ८,८७,०८० महिला स्त्री व ३७ तृतीयपंथीय मतदार आहेत. ५१८९ दिव्यांग, २५३० सैन्य दलातील मतदार आहेत. ते २४ उमेदवारांचे भाग्य ठरवतील. दोन हजार मतदान केंद्रांसाठी ८९१६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ८९१ मनुष्यबळ राखीव आहेत. १८ सखी मतदार केंद्रे आहेत. या ठिकाणी निवडणूक अधिकारी व पोलीसदेखील महिलाच राहतील. ३७ संवेदनशील केंद्रांवर ३७ मायक्रो आॅब्झर्व्हर नेमले आहेत, तर एकूण ६१ मायक्रो आॅब्झर्व्हर नियुक्त आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपल्यानंतर एसएसटी, फ्लार्इंग स्कॉड आदीद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत पाहणी करीत आहेत. या कालावधीत १८ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली तर आचारसंहिता उल्लंघनाबाबत आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहे. कुठेही संशय वाटल्यास व्हीडीओ कॅमेरा पथकाची नजर राहणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाच्या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन शैलेश नवाल यांनी केले आहे.ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून यावर मॉनिटरिंग होणार आहे. या निवडणुकीसाठी चार हजार बीयू, दोन हजार सीयू व दोन हजार व्हीव्हीपॅट लागणार आहेत. याव्यतिरिक्त ८३० बीयू, ४१५ सीयू व ४१५ व्हीव्हीपॅट राखीव आहे. कुठल्याही केंद्रावर यंत्र बंद झाले असल्यास, ते अवघ्या ३० मिनिटांत बदलणार असल्याचे शैलेश नवाल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती