अमरावती : शेतकऱ्यांच्या विकासासाठी अंजनगाव सुर्जी येथे कृषिविकास केंद्राची निर्मिती करू, असा निर्धार महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी प्रचारसभेत व्यक्त केला. यावेळी अभिनेता गोविंदा यांनी रोड शो करून नागरिकांना संबोधित केले.अंजनगाव सुर्जी येथे एमआयडीसीची निर्मिती करून स्थानिक युवकांना रोजगार देऊ, प्रत्येक गरजवंताला घरकुल देण्यासाठी आपन प्रयत्नशील राहणार असल्याचे राणा यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न काढता यावे, यासाठी कृषिउद्योग केंद्राची निर्मितीसाठी आपण प्रयत्नरत राहू. या भागातील केळी, संत्रा व पिंप्री याचे अधिकाधिक उत्पन्न वाढावे, या पिकांसाठी प्रक्रिया उद्योग उभारले जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणा म्हणाल्या. तालुक्यातील प्रत्येक गावात बसचा लाभ मिळावा, गरजू कुटुंबाला घरकुल यांसह अन्य सुविधांसाठी वचनबद्ध असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. तालुका, जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत यांना निवडून देण्याचे आवाहन गोविंदा यांनी केले. यावेळी लीला डिके, सरपंच अलका दामले, ज्योती चिंचखेडे, आबिदा शहा, शांताबाई अभ्यंकर, प्रतिभा रोहनकर, पुष्पा लव्हाळे, उषा काळे, प्रवीणा राऊत, देविका गवळी आदी उपस्थित होत्या.
Lok Sabha Election 2019; अंजनगाव सुर्जी येथे कृषी विज्ञान केंद्राची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:21 AM