लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघात एसएसटी पथकाने केलेल्या कारवाईत २० लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती की नाही, ही बाब पडताळणीनंतर आगामी दिवसात कळेल. मात्र, निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.राजकीय आखाडा हा पैशांच्या जोरावर चालतो, ही बाब जगजाहीर आहे. अगदी निवडणूक अर्ज घेण्यापासून ते दाखल करण्यापर्यंत आणि निवडणूक प्रचारादरम्यान मोठा जनसमुदाय आपल्यामागे असल्याचे दाखविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. पेंडॉलमध्ये गर्दी दाखवावी लागते. त्यांच्या दिमतीला वाहन ठेवावे लागते. एखाद्या पक्षातील दिग्गजाला प्रचारासाठी बोलवायचे असल्यास त्यासाठीही थैली रिकामी करावी लागते. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी त्यांना ‘रेट’नुसार रक्कम दिली जात असल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करताना निवडणूक विभागाच्या पथकाला हमखास मोठ्या रकमा हाती लागतात. अमरावती लोकसभा मतदारसंघात फक्त सात दिवसांत २० लाखांची रोकड पकडली गेली. २३ ते २९ मार्चदरम्यान शहरातील विविध ठिकाणी वाहनांच्या केलेल्या तपासणीतून तब्बल १२ लाख ६ हजार ३५० रुपयांची रोख जप्त केली. याशिवाय बडनेरा रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशांकडून ८ लाख १० हजारांची रोख जप्त केली आहे. निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली जाते. त्यातही ‘दाम’चा वापर भरपूर होत आहे.पैशांची देवाण-घेवाण होते कशी?निवडणुकीच्या काळात पैसा कोणत्या मार्गाने व कोणत्या पद्धतीने पोहचविला जातो, यावर निवडणूक विभागासह पोलीस लक्ष ठेवून असतात. हवालातून पैशांची देवाण-घेवाण केली जाते. चारचाकी वाहनातून पैशांची वाहतूक निदर्शनास येत आहे. दुचाकीने कमी रकमेची वाहतूक केली जाते. कोणाला संशय येऊ नये म्हणून शाळकरी मुलांच्या स्कूल बॅगमध्ये पैसे ठेवूनही त्याचे आदानप्रदान केले जात असल्याचे आतापर्यंतच्या घडामोडीवरून निदर्शनास आले आहे.
Lok Sabha Election 2019; निवडणुकीत पैशांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:11 AM
निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघात एसएसटी पथकाने केलेल्या कारवाईत २० लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती की नाही, ही बाब पडताळणीनंतर आगामी दिवसात कळेल. मात्र, निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ठळक मुद्दे२० लाखांची रोकड जप्त : निवडणूक विभागाच्या एसएसटी कारवाईवरून उघड