Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, केंद्रीय अमित शाह यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
निवडणुकांवर नियंत्रण ठेवता येत नाही; ईव्हीएम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले
"हे स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, असंही अमित शाह म्हणाले.
यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. शाह म्हणाले, राहुल गांधी यांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. पण ते सोहळ्याला आले नाहीत. आज ते अमरावतीत सभेला आले होते. पण, त्यांना ऐकायला कोणच नव्हते. आधी त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे. तरच तुम्हाला देशात ऐकायला लोक येतील, असा टोलाही शाह यांनी लगावला.
"या लोकांनी मंदिराला थांबवून तर ठेवलंच पण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाऊन प्रभु श्रीरामांचा अपमान करण्याच काम यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त राम मंदिरच नाही तर औरंगजेबने तोडलेले काशीविश्वनाथचे कॉरीडॉर बनवले, केदारनाथ, बद्रीनाथमध्येही काम केले, आता सोमनाथाचे मंदिरही सोन्याचे बनत आहे. मोदीजींनी आपल्या मानबिंदूंचे सन्मान करण्याचे काम केले, असंही अमित शाह म्हणाले.