शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अमरावती येथे सायन्स कोअर मैदानावरून कडू-राणा आमने-सामने

By गणेश वासनिक | Published: April 23, 2024 5:22 PM

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिशाभूल, सुरक्षेच्या कारणांनी पोलिसांनी प्रहार उमेदवारांना ताबा घेण्यापासून रोखले, आ. बच्चू कडूंचा ठिय्या.

गणेश वासनिक, अमरावती:अमरावती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल राेजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोअर मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, २३ व २४ एप्रिल रोजी हे मैदान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या उमेदवारांच्या नावे बुकींग आहे. परंतु, भाजप उमेदवारांनी विनापरवानगी या मैदानावर शहाच्या सभेची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणांनी प्रहार आमदार बच्चू कडू, उमेदवार दिनेश बुब यांना मंगळवारी मैदानाचा ताबा घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमदार बच्चू कडू आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मैदानाच्या परवानगीवरुन आमदार बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा हे आमने-सामने येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी पोलिस प्रशासन हे भाजपच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी २४ एप्रिल राेजी सायन्स कोअर मैदानावर प्रहार उमेदवारांची सभा आणि रॅली घेणार असल्याची दावा त्यांनी केला. आमच्याकडे मैदानाची अधिकृत परवानगी कायदा व सुव्यवस्था तोडण्याचे काम पोलिस करीत आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे या मैदानाची परवानगी नसताना गृहमंत्री शहा यांची कशी सभा घेण्यास पोलिस प्रशासन सहकार्य करीत आहे, असा टोला लगावला. राणांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिशाभूल असेही आमदार कडू म्हणाले.

टॅग्स :AmravatiअमरावतीBacchu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४