श्यामकांत सहस्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बडनेरा रेल्वे स्थानकावर बीडीडीएस, आरपीएफ, जीआरपी विशेष लक्ष ठेवून आहे. संशयित वस्तूंची तपासणी केली जात आहे. माइकवरून प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.बडनेरा रेल्वे स्थानकाची बीडीडीएसकडून नियमित तपासणी होत असते. हल्ली तणावाची स्थिती असल्याने तपासणी मोहीम संवेदनशीलतेने हाताळली जात आहे. त्यातच आरपीएफ, जीआरपी, रेल्वे प्रशासन प्रवाशांमध्ये जागृती करीत आहे.रेल्वे स्थानकावर माइकमधून प्रवाशांना सतर्क केले जात आहे. बेवारस वस्तू, अनोळखी इसम आढळल्यास सर्वप्रथम आम्हाला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले. बीडीडीएसने गुरुवारी रेल्वे स्थानकावरील बेवारस वस्तू, कॅन्टीनमधील बॉक्स, प्रवासी गाड्यांमधील बेवारस बॅग तपासल्या तसेच रेल्वे स्थानक परिसरातील वाहन पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या डिक्की तपासण्यात आल्या. रेल्वे स्थानकावरील तिकीट बूकिंग कार्यालयाजवळ प्रवाशांची गर्दी असते. आॅटो-बसजवळ गर्दी असते. त्या ठिकाणाची तपासणी करण्यात आली. बीडीडीएसचे पोलीस निरीक्षक जयंत राऊत, आरपीएफचे राजेश बढे, जीआरपीचे एस.डी. वानखडे यांच्या मार्गदर्शनात बडनेरा रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेवर लक्ष दिले जात आहे. बडनेरा रेल्वे स्थानक वर्दळीचे ठिकाण आहे. दरदिवशी ४० ते ५० प्रवासी गाड्या येथून इतरत्र जातात. शेकडो प्रवासी प्रवास करतात. वर्दळीचे ठिकाण म्हणून याकडे प्रशासन अधिक लक्ष देत आहे.गर्दीची ठिकाणे नजरेच्या टप्प्यातबीडीडीएसने तपासणीसाठी दोन पथके तयार केलीत. या पथकांनी अलर्टनंतर गर्दीची ठिकाणांसह वॉलमार्ट, डी-मार्ट, पार्किंगची ठिकाणे, मंदिरे, बस स्थानक, रेल्वे स्थानक तपासली जात आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. संशयित वस्तू वा इसम आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन केले आहे.स्कॅनरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तपासणीबडनेरा रेल्वे स्थानकावर असणाºया स्कॅनरमधून प्रत्येक बॅग तपासली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संशयित वस्तू व इसमांवर नजर ठेवली जात असल्याची माहिती आहे. रेल्वे स्थानकावर येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. या रेल्वे स्थानकाला सुरक्षा भिंत नाही.
बडनेरा रेल्वे स्थानकावर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:11 AM
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बडनेरा रेल्वे स्थानकावर बीडीडीएस, आरपीएफ, जीआरपी विशेष लक्ष ठेवून आहे. संशयित वस्तूंची तपासणी केली जात आहे. माइकवरून प्रवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
ठळक मुद्देआरपीएफ, जीआरपी, बीडीडीएसची संयुक्त मोहीम, माहिती द्या - प्रवाशांना आवाहन