लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक दृष्टीने व पोलीस ठाण्यात उपद्व्यापी भूमिका बजावणाºया पोलीस कर्मचाºयांवर पोलीस आयुक्त करडी नजर ठेवून आहेत. यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी सर्व ठाण्यांतील ड्युटी आॅफिसरला पत्र दिले असून, उपद्व्यापी पोलिसांची नावे कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत १ हजार ८०० च्या जवळपास पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी नियमित ड्युटी बजावून त्यांचे कर्तव्य बजावतात; मात्र काही कर्मचारी उपद्व्यापी असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस ठाण्यात ड्युटी बजावताना तक्रारदारांना असभ्य वागणूक देण्याचे प्रकार घडतात. तक्रार ऐकून न घेता तक्रारकर्त्यांची उलटतपासणी केली जाते. अनेकदा पोलीस कर्मचारी ड्युटीवर मद्यपान करून तैनात असतात. अशा प्रसंगी वादविवादासह ठाण्यातील साहित्याची तोडफोड झाल्याचीही एक घटना नुकतीच उघड झाली. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी हरिदास इंगळे नामक पोलीस कर्मचाºयाचे निलंबनसुद्धा केले आहे. याव्यतिरिक्त अशा प्रकारच्या उपद्व्याप करणाºया काही पोलिसांच्या बदल्यादेखील करण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पालन न करणे, समाजात वावरताना आर्थिक हेतूने काम करणे अशा विविध प्रकारचे उपद्व्याप पोलीस कर्मचारी करीत असल्याचे आढळून आले आहे. असे प्रकार करून पोलिस विभागाची ख्याती धुळीस मिळविणाºया कर्मचाºयांना पोलीस आयुक्तांनी ‘उपद्व्यापी’ संबोधले आहे. अशा पोलीस कर्मचाºयांवर अंकुश ठेवण्यासाठी आता पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलले असून, त्यांनी सर्व ठाण्यातील ड्युटी आॅफिसरला पाच मुद्द्यांचे अनुपालन न करणाºयांची नावे सुचविण्यास सांगितली आहे. त्यामुळे आता उपद्व्याप करणाºया पोलिस कर्मचाºयांची खैर नसल्याचे दिसून येत आहे.पोलीस ठाणे व समाजात वावरताना काही पोलीस कर्मचारी उपद्व्यापी भूमिका बजावतात. अशा पोलिसांची नावे मागविण्यात आली असून, यासंदर्भात सर्व ठाण्यांना पत्र दिले आहे. उपद्व्याप करणाºया पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.
उपद्व्यापी पोलिसांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:04 AM
सामाजिक दृष्टीने व पोलीस ठाण्यात उपद्व्यापी भूमिका बजावणाºया पोलीस कर्मचाºयांवर पोलीस आयुक्त करडी नजर ठेवून आहेत.
ठळक मुद्देसीपींचे ड्युटी आॅफिसरला पत्र : बदली, निलंबन कारवाईचा बडगा