भुर्दंड : दूध, शीतपेय विक्रेत्यांची मनमानीधारणी : मेळघाटात शीतपेय विकणारे ग्राहकांची 'कुलिंग चार्जच्या' नावाखाली मोठ्या प्रमाणावर लूट करीत आहे. ज्या ब्राण्डेड मालाची जास्त मागणी आहे अशा शीतपेयावर दोन ते पाच रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे विक्रीकर विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप सामान्य जनता करीत आहे.यावर्षी उन्हामुळे अंगाचे लाही लाही होत आहे. पारा ४० सें. ते ४५ सें. पर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना याचा प्रचंड त्रास जाणवत आहे. त्यातही भारनियमनाच्या नावाखाली ८ ते १६ तासांचे भारनियमनाने यात आणखी भर टाकले आहे, अशा प्रचंड गर्मी व उकाळ्यापासून शरीराचे सरंक्षण करण्यासाठी लोकांना नाईलाजास्तव शीतपेयाचे आधार घ्यावा लागत आहे. लोकांची गरज व शितपेयांची वाढती मागणी लक्षात घेता दुकानदारांनी छापील किंमतीपेक्षा अधिक किंमतीपेक्षा अधिक किंमत आकारुन जनतेची लूट सुरू केली आहे.एखाद्या ग्राहकाने छापील किंमतीचा दाखला देण्याचा प्रयत्न केल्यास 'लेना है तो लो नही तो दुसरी दुकान देखो' असे उत्तर देण्यात येत आहे. याबाबत विचारणा केल्यास मालाचा तुटवडा असल्याने आम्हालाच चढ्या दराने शीतपेय व दूध खरेदी लागत असल्याचा जबाब दुकानदाराकडून मिळत आहे. त्यामुळे उन्हाळयात दुधाचा होणारा तुटवडा व शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शीतपेयाची आवश्यकता पूर्ण करताना ग्राहकांना प्रतिष्ठित पेयासाठी अतिरिक्त मूल्य मोजावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट
By admin | Published: June 03, 2016 12:21 AM