शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

आंबियाची फळगळ कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:26 PM

जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाला उशिरा जाग : कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात संत्रा उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबिया बहराच्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर कृषी विभागाला जाग आली. ही तिसºया अवस्थेतील फळगळ किंवा पूर्ण वाढ झालेल्या व अपरिपक्व फळांची गळती असल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे विदर्भाचा कॅलीफोर्निया अशी ओळख असलेल्या राज्याचे कृषिमंत्र्यांच्या मोर्शी मतदारसंघासह अन्य चार तालुक्यांतील संत्राउत्पादक संकटात सापडला आहे.यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असताना संत्राउत्पादकांनी टँकरने पाणी आणून बागा जगविल्या. यामध्ये ज्या बागा वाचल्या त्यांच्या आंबिया बहराची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ही फळगळ नत्राच्या कमतरतेमुळेही होत असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. फळांच्या वाढीसाठी नत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नत्रामुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते तसेच आॅक्सिझन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनिया अमोनिअम या संयुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरीत्या युरियाची फवारणीद्वारे वाढविता येते. कर्बोदकांच्या अभावामुळे पाने, फुले व फळे यांच्यात पेशीक्षय होतो. पावसाळयात होणाºया सततच्या पावसाच्या पाण्याने जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायूचा कमी प्रमाणात पुरवठा होतो. बोट्रिओडिप्लोडिआ, कलेटोट्रिकम व काहिअंशी आॅल्टरनेरिआ या बुरशीमुळे फळांची गळती होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर रोग जास्त पसरतो. तसेच काळी माशी, मावा-तुडतुडे यांच्या शरीरातील निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशी वाढून पेशीक्षय होऊन फळगळ होते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे आवश्यक आहे. साधारणपणे एका फळाची पूर्ण वाढ होण्यास जवळपास ४० पाने असावी लागतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली.अचलपूर तहसीलदारांना निवेदनपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अज्ञात रोगाने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक मोठ्या प्रमाणात संत्रा फळांची गळती होत असल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी दीपक सुरेश पाटील, राहुल नंदकुमार तट्टे, सुधीर सुदाम चरोडे, शांताबाई सुधाकर चरोडे, रवींद्र पुंडलिकराव निकम, अनिल चरोडेसह परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.असे करावे व्यवस्थापनकृत्रिम जैवसंजीवक नॅफथॅलीन (एन.ए.ए.) वनस्पतीतील अंतर्गत आॅक्सिझन वाढवून पेशीक्षय मंद करण्याचे कार्य करतात. बुरशीजन्य रोगांमुळे होणारी फळगळ कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाच्या फवारण्यामुळे रोखू शकतो. नत्राची कमतरता युरियाच्या फवारणीमुळे दूर करू शकतो. फळगळ रोखण्यासाठी तातडीने एन.ए.ए. किंवा २४-डी १५ पीपीएम १.५ ग्रॅम अधिक युरिया १ किलो अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम १०० लिटर पाण्यात फवारणी करावी. फळगळ निंयत्रणात न आल्यास आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात ही फवारणी करावी.अशी घ्यावी काळजीझाडावर भरपूर पालवी राहावी यासाठी अन्नद्रव्यांचा शिफारसानुसार वापर करावा. फळांच्या तोडणीनंतर लगेच वाळलेल्या फांद्या छाटून टाकावी. पावसाळ्यात बगिच्यात पाणी साचू देऊ नये. बगिच्यातील जास्तीचे पाणी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सेमी खोल, ३० सेमीखालची रुंदी व ४५ सेमी वरची रुंदी असलेले चर खोदावेत. गळलेली फळे तातडीने उचलून दूर फेकावीत. नॅफथॅलीन सेटिन सिड एनएए किंवा २४-डी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे ४०-५० मिली अल्कोहोल किंवा सिटोनमध्ये विरघळून घ्यावीत.