लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पळसखेड येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात सोमवार व मंगळवारी तालुक्यात धुंवाधार पाऊस झाला. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी व गावातील नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे, सावंगी संगम शिवारातील शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही चांगले उगवले. मात्र उगवलेले शेतातील सोयाबीन, तुर, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वारूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाकडून अजून पर्यंत नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्याने सर्वेक्षण करून शासनाने मदत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे रायगड प्रलकपाच्या कामाला चार वर्षांआधी सुरुवात झाली. पण, अद्याप प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. कधी शासनाकडे पैसा नसतो, तर कधी या प्रकल्पाचे कंत्राटदार बदलतात. यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळत चालले आहे. वारंवार कंत्राटदार बदलत चालल्याने त्या कामाच्या प्रतवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत बांधण्याचे काम सुरू झाले व राईगुई नदीच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत मोठमोठ्या भिंती उभारल्या. दरवर्षी या नदीला चांगले पाणी असते. महापूरही येतात. मात्र, आता या नदीच्या दोन्ही कडेला भिंत बांधल्याने जमा झालेले पाणी एकाच मार्गाने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने भिंतीलगतच्या शेती व समोरील गावातील शेती खरडून जात आहे. दोन वर्षांपासून चांगली जमीन या पुरामुळे पडीक राहत अल्याचे सावंगी संगम, एकपाळा या गावातील शेतकऱ्यांची ओरड आहे.रायगड प्रकल्प बंद असल्सामुळे जमीन खरडलीरायगड प्रकल्प बंद पडल्यामुळे धरणातील साचलेले पाणी एकाच ठिकावरून वाहत असल्याने जमीन खरडून गेली व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्याने नदीचे बांध फुटले. ते बांध जर वेळेत बांधले नाही तर आणखी नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी वासुदेव काळमेघ यांनी दिली.कृषी विभागाकडून बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचेकृषी विभागाकडून जे बंधारे बांधण्यात आले, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याची मी कृषी विभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. पण, त्याची दखल कुणीही घेतली नाही. तेच बंधारे फुटले आणि तेथून शेतात पाणी शिरल्याने आमचे सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली आले, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी दिनेश जवळकर यांनी दिली.
अपूर्ण रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:53 PM
तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
ठळक मुद्देखरडून गेलेल्या शेताचे सर्वेक्षण केव्हा ?: पळसखेडच्या शेतकऱ्यांचा सवाल