गजानन मोहोड
अमरावती : खरिपात पीक काढणी पश्चात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी १३,४०६ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना पीक विमा कंपनीकडे दिल्या होत्या. त्यापैकी ७,१५२ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी रात्री १० नंतर १२.२६ कोटींचा परतावा जमा करण्यात आल्याची माहिती कंपनीद्वारा देण्यात आली.
गतवर्षी सरासरीपेक्षा सर्वच तालुक्यात जास्त झालेला पाऊस व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यासाठी पीक विमा योजनेत सहभागी ७२,६३९ शेतकऱ्यांना परतावा यापूर्वी देण्यात आलेला आहे. याशिवाय एक आठवड्यापूर्वी ६,१२९ शेतकऱ्यांना ७.२४ कोटींचा परतावा कंपनीद्वारा देण्यात आलेला आहे.
याशिवाय परतीच्या पावसामुळे पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाले होते. यासाठी आता कंपनी स्तरावर ७,१५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२.२६ कोटींचा परतावा शुक्रवारी रात्री उशीरा जमा करण्यात आल्याची माहिती कंपनी स्तरावरून देण्यात आली आहे.