समाजासमोर आदर्श : निचत परिवाराचा पुढाकारअमरावती : श्रीमंत तरुण-तरुणी हॉटेल, मॉल व कॉफी शॉप, विविध ठिकाणी व्हॅलेन्टाईन डे साजरा करून लाखो रुपये खर्च करतात. परंतु याला फाटा देऊन येथील हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ मनोज निचत व त्यांच्या परिवाराने येथील 'होलीक्रोस होम फॉर बेबी' या अनाथालयातील लहान मुलांसोबत 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्याचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यफुल्ले होेते. तरुण- तरुणांमध्ये वेगळया प्रकारे 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा करण्यात आला. अलीकडे तरुणांनी पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारणे सुरू केले आहे. पण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले निचत परिवार यांनी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील २० मुले - मुलींना एक महिना पुरेल, असे दूध पॉवडर तसेच बिस्कीट, नवीन कपड्यांचा वाटप करण्यात आला. यावेळी राजेंद्र निचत, शैलेश बहादुरे, कार्डीओलॉजीस्ट गौरव वसुले व श्रीकृष्ण हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रेम वाटल्याने कमी होत नसून त्यात अधिक भर पडते, असे विचार यावेळी डॉ.मनोज निचत यांनी अनाथालयातील उपस्थित मुलांवर व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अनाथालयातील मुलांसोबत ‘प्रेमदिन’
By admin | Published: February 15, 2017 12:14 AM