अमरावती : अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलच तापलं आहे. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार राणा आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.
अमरावतीत एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी पीडित मुलीला पोलीस ठाण्यात आणावं. या प्रकरणी तपासाला इतका उशीर का लागतोय, असा सवाल करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.
या प्रकराणातील वास्तव जाणून घेण्यासाठी खासदार राणा राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. तेथे कॉल रेकॉर्डिंगवरून त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तू तू मै मै झाली. आपण दलित आहोत त्यामुले आपण माझी कॉल रेकॉर्डिंग करता असा आरोप नवनीत राणा यांनी केला.