तुळसा स्वर्गे ठरल्या प्रथम पुरस्काराच्या मानकरी : ‘लोकमत’ने घेतला होता पुढाकार
धामणगाव रेल्वे : ग्रामस्थांनी कर भरण्यासाठी विविध उपाययोजना सुचविणाऱ्या ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल घेत तालुक्यातील विरूळ रोघे ग्रामपंचायतीने शंभर टक्के कर वसुलीची मोहीम राबविली. यात पहिले बक्षीस तुळसा स्वर्गे यांना देण्यात आले. त्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला.
तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून समजली जाणारी आणि नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या विरूळ रोंघे ग्रामपंचायतने कर स्वरूपातील संपूर्ण रक्कम वसूल करण्यासाठी अभिनव शक्कल अजमाविली होती. गृहोपयोगी साहित्याचा लकी ड्रॉ ठेवला होता. यामुळे या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली. योजनेची सोडत गुरुवारी विरुळ रोंघे येथील भास्कर महाराज सभागृहात झाली. मार्च २०२१ पर्यंत संपूर्ण कर भरतील, त्यांचा यात समाविष्ट करण्यात आला होता. संपूर्ण कर भरा आणि लकी ड्रॉमध्ये बक्षीस जिंका, असे आवाहन सरपंच रूपेश गुल्हाने, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गोपाल मांडुलकर, मंगेश गुल्हाने, पुष्पा डबळे, रंजना, चौधरी, प्रकाश रोंघे, वैशाली राऊत, प्रेमलता वर्मा, राधिका रोंघे, ग्रामसेवक अतुल गडलिंग आदींनी केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षीस फ्रीज तुळसा स्वर्गे, दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही दिलीप अंबाडकर, तिसरे बक्षीस डेझर्ट कूलर उषा गोंडाणे, चौथे बक्षीस ड्रेसिंग टेबल रामराव रोंघे, पाचवे बक्षीस गॅस गिझर महादेव खंडारे, सहावे बक्षीस स्टँड फॅन कृष्णा ढेवले, सातवे बक्षीस मिक्सर राजीव रोंघे, आठवे बक्षीस होम थिएटर संदीप जुनेवाल, नववे बक्षीस कूकर रामभाऊ आकोटकर व दहावे बक्षीस इलेक्ट्रिक प्रेस हे अनिल खुरपडे यांना देण्यात आले.
कोट
गावात नवीन उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून ‘लोकमत’ने नेहमी ग्रामविकासासाठी पुढाकार घेतला आहे. ‘कर वसुलीसाठी लकी ड्राॅ’ ही बातमी आम्ही ‘लोकमत’मध्ये वाचली आणि ती विरुळ रोंघे ग्रामपंचायतीमार्फत राबवली. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
- पंकज वानखडे, माजी सभापती, पंचायत समिती
कोट २
विरूळ रोंघे ग्रामपंचायतमार्फत कर वसूल करण्यासाठी लकी ड्राॅ योजना यशस्वीपणे अंमलात आणली. यामुळे ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात करवसुली झाली आहे.
अतुल गडलिंग, ग्रामसेवक, विरूळ रोंघे
-------------------
फोटो कॅप्शन : लकी ड्राॅ योजनेच्या विजेत्यांना बक्षीस देताना सरपंच, ग्रामपंचायत सदस्य.