शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

सागवान तस्करांचे ‘माफियाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:07 PM

मेळघाटच्या जंगलातील सागवानची तस्करी करणारे दोन्ही तस्कर दुसऱ्यांदा नोटीस बजावूनसुद्धा रविवारी वनाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाहीत. दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीनला दीड वर्षांत चारवेळा अवैधरीत्या सागवान नेताना पकडण्यात आले.

ठळक मुद्देचार वाहने जप्त : हर्षोद्दीनचा तडीपारीचा प्रस्ताव, वन विभागातील म्होरक्यांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटच्या जंगलातील सागवानची तस्करी करणारे दोन्ही तस्कर दुसऱ्यांदा नोटीस बजावूनसुद्धा रविवारी वनाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाहीत. दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीनला दीड वर्षांत चारवेळा अवैधरीत्या सागवान नेताना पकडण्यात आले. तस्करीसाठी वापरलेली चारही वाहने वनविभागाने जप्त केली. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांकडे पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग परिक्षेत्रातील बिहाली वर्तुळात सागवान वृक्षांची अवैध कत्तल करून त्याच्या चरपटा व इतर साहित्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येताच वनविभागात एकच हडकंप माजला होता. वरिष्ठांना कळविल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत गोपनीयरीत्या सुरू झालेल्या कारवाईत दस्तुरखुद्द वनविभागाला समस्यांचा सामना करावा लागला. याप्रकरणी १७ सागवान वृक्षतोड केल्याबद्दल कोहाना येथील तीन आदिवासींना ताब्यात घेण्यात आले. वनकोठडीत त्यांनी सागवान ज्या तस्करांना विकले, त्यांचे पत्ते दिले. त्यावरून शहराच्या अजिजपुरा भागात अग्गा ऊर्फ कल्लू याच्या घरातून सागवान फर्निचर जप्त करण्यात आले, तर ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीन इनामदार याच्या मार्कंडा येथील घरझडतीत काहीच आढळून आले नाही. मात्र, दोघांनाही वरिष्ठ वनाधिकाºयांपुढे हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी दुसऱ्यांदा नोटीस बजावूनदेखील सायंकाळपर्यंत ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता वनाधिकारी पुढे काय कारवाई करतात, यावरच पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.आदिवासी मोहरे; सागवानचा साठा पकडामेळघाटच्या जंगलात अवैध वृक्षतोड करून मिळविलेल्या सागवानच्या चरपटा व इतर साहित्य परतवाडा व परिसरातील काही ठरावीक फर्निचर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्री ते पहाटे ५ या वेळेत आणून अल्प किमतीत या तस्करांना विकले जाते. आदिवासींना किरकोळ रकमेचे आमिष दाखवून सागवान तस्कर त्यांच्याकडून हे कृत्य करवून घेत असल्याचे सत्य आहे. त्यामुळे वनविभागाने मोठे धाडसत्र राबवून शहरातील अवैध सागवानाचा जखिरा पकडण्याची करामत दाखविण्याची गरज आहे.हर्षोद्दीन तस्कर नव्हे, माफिया?परतवाडा वनविभागाच्या पथकाने ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन इनामदार याला दीड वर्षात चार वेळा दोन लाखांची सागवान तस्करी करताना वेगवेगळ्या चार वाहनांत पकडले. प्रत्येक वेळी सागवानसह त्याची कार जप्त करण्यात आली. तरीही हार न मानता त्याने तस्करी सुरूच ठेवल्याचे यावरून स्पष्ट होते. लाखो रुपयांच्या चार कार पकडण्यात आल्यानंतरसुद्धा सागवान तस्करीचा व्यवसाय सुरूच आहे. बिहाली जंगलातील सागवान त्याला विकल्याची कबुली कोहाना येथील आरोपींनी दिली. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना दिला असल्याचे परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ब्राह्मणवाडा थडी, परतवाडा, अचलपूर, अंजनगाव या संपूर्ण पट्ट्यात सागवान माफियांचा राज असल्याने त्याच्यावर कारवाईची गरज आहे, हे विशेष.वनपाल परतले, वनाधिकाऱ्यांमध्ये जुंपलीचिखलदरा व घटांग येथील वनाधिकारी, कर्मचारी परतवाडा शहरात धाडी टाकत असताना, परतवाडा येथील अधिकारी-कर्मचारी सहकार्य न करता सुट्टीवर गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच वनपाल बाबूराव झांबरे तत्काळ कर्तव्यावर हजर झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात संपूर्ण सहकार्य केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता किती सागवान तस्करांवर कारवाई होते. यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच समकक्ष अधिकाºयांमध्ये जुंपल्याची चर्चा वनवतुर्ळात सुरू आहे.