शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

महाआघाडी, भाजपला अतिआत्मविश्वास नडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 5:13 AM

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा.

 - गणेश देशमुखअमरावती - ‘अंडरकरन्ट’ असल्याचा भाजपचा अतिआत्मविश्वास आणि सत्तेच्या सूर्याचे तेज कुठल्याही चेहऱ्याला प्रकाशमान करू शकते, हा महाआघाडीचा स्वत:वरील आंधळा विश्वास दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षांना पराभवाच्या मार्गाने नेणारा ठरला.अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. राजकीय वारसा आणि वातावरण लाभलेल्या वाशिम जिल्ह्यातील सरनाईक यांनी निवडणुकीची तयारी शांततेने, परंतु नियोजनबद्धरीत्या केली. मला निवडून देणे तुमच्या कसे हिताचे, हे शिक्षकांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. राज्यातील सत्तापक्षाला आणि विरोधी पक्षाला नेमके तेच जमले नाही.४० तास अखंडित मतमोजणीदरम्यानचे अनेक क्षण उत्कंठावर्धक ठरले. लढत एकतर्फी कुठल्याही फेरीत नव्हतीच. ती कायम तिरंगी होती. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक, महाआघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष शेखर भोयर हा क्रम सातत्याने कायम राहिला. सरनाईक यांची सुरुवातीला सुमारे एक हजार मतांची आघाडी अखेरपर्यंत धिम्या गतीने दुपटीपार गेली.अनुदान, पेंशनचा मुद्दा निर्णायकया निवडणुकीत शिक्षकांचे दोन महत्त्वाचे मुुद्दे चर्चेत आलेत. ज्या शाळांना अनुदान नाही, त्या शाळांतील शिक्षकांना वेतन मिळत नाही. दशक, दोन दशकांहून अधिक काळापासून असे शिक्षक शाळेला अनुदान मिळेल नि आम्हाला वेतन, या आशेवर जगत आहेत. मुलाबाळांसाठी पैसाच नसल्यामुळे काहींनी आत्महत्याही केल्यात. सुमारे चार हजार शिक्षक या विनावेतनाच्या यातना भोगताहेत. श्रीकांत देशपांडे यांची यापूर्वीच्याही सत्तेशी जवळीक असताना त्यांनी हा मुद्दा सोडविला नसल्याच्या कारणाहून शिक्षकांमध्ये नाराजी होती. मतांचा जोगवा मागण्यासाठी देशपांडे यांच्याकडून जाणाऱ्या ‘फोन कॉल्स’ला अनेक शिक्षकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या. त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली. सत्तेच्या भरवशावर उमेदवार निवडून आणण्याचा अट्टाहास करण्याऐवजी शिक्षकांना चालणारा चेहरा देण्याची नीती महाआघाडीने आखली असती, तर अमरावती शिक्षक मतदारसंघावरही महाआघाडीचाच विजयी झेंडा असता. या निवडणुकीत शिक्षकांनी ८९ टक्के असे ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान केले. सत्तापक्ष असो वा विरोधी, कुणाच्याही प्रभावात न येता शिक्षकांनी त्यांचा प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडला. 

भाजप लढतीतून बाद   ‘आमच्या पक्षाचा अंडरकरंट आहे. लोकांना मोदी आणि देवेंद्र फडणवीस हवे आहेत,’ हा भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला अतिआत्मविश्वास शिक्षक मतदारांना यावेळी नकोसा झाला.  पक्षाला आणि उमेदवारांना अखेरपर्यंत त्याचा अंदाज आलाच नाही. ‘भाजपचे तिकीट म्हणजे आमदारकीवर शिक्कामोर्तब,’ हे समीकरण आता जुने झाल्याचे या निकालाने अधोरेखित केले. अमरावती हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांच्या मामांचा गाव. दोघांनाही अमरावतीची त्यामुळे आपुलकी.  अमरावतीकरांनाही दोन्ही नेत्यांचे अप्रूप. असे असले तरी यावेळी शिक्षकांवर त्यांची जादू चालली नाही. भाजपचे उमेदवार नितीन धांडे मुख्य लढतीतच आले नाहीत. २२ व्या फेरीत ते बादही झाले. अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांनी अखेरपर्यंत तृतीय स्थान टिकवून ठेवले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषद