शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

महाबीजनेच ठगविले, विश्वास ठेवायचा कुणावर?

By admin | Published: November 29, 2014 12:20 AM

शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’वर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.

गजानन मोहोड अमरावतीशासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’वर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र उगवणशक्तीअभावी खरिपाच्या पेरणीला मोड आली, तक्रारी केल्या, पाहणी झाली. परंतू मोबदला मिळालाच नाही, विश्वास ठेवायचा कुणावर? असा संतप्त सवाल पूर्णानगर येथे महाबीजकडून फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यातील पूर्णानगर व परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी सेवा केंद्र व यश कृषी सेवा केंद्रातून शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या ‘महाबीज’ या बियाणे कंपनीचे ३३५ या जातीचे वाण खरेदी केले व त्याची पेरणी केली. लॉट नंबर (ओसीटी-१३-१३-३८०६-४०३४) हे बियाणे पेरणीपश्चात उगवलेच नाही. आठ दिवस बियाणे उगवण्याची वाट पाहिल्यानंतर पूर्णानगर, येलकी, वातोंडा, मार्की, मिर्झापूर, अंचलवाडी, उमरटेक, सावणपूर येथील शेतकऱ्यांनी भातकुली पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांची फसवणूकशेतकऱ्यांनी तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा कुठे तक्रार निवारण समितीने पाहणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनीदेखील पूर्णानगर येथे जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान महाबीजचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बियाणे परतावा देण्याचे मान्य केले, असे शेतकरी सांगतात. परंतु आजतागायत त्यांना ना बियाने परतावा किंवा ना रोख स्वरुपात भरपाई मिळाली. कुठल्या बियाणे कंपन्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा कसा, असा त्यांचा संतप्त सवाल आहे. वांझोट्या सोयाबीनची उगवणशक्ती दाखविली ७१ टक्केलॉट क्रमांक ४०१५, ४०३४, ४०१६ व ४००९ मधील सोयाबन ३५५ जातीचे बियाणे खरेदी केले. या बियाण्यांना महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला यांनी मुक्तता अहवाल (रिलीज रिपोर्ट) १७ फेब्रुवारी २०१४ ला दिला यामध्ये लॉट क्रमांक ४०३४ मधील बियाण्यांची उगवणक्षमता ७१ टक्के असल्याचे दर्शविण्यात आले. यावर ओ.आय.खान, कृषी अधिकारी, एस.जी.ए. परभनी यांची स्वाक्षरी आहे. हाच नमुना नागपूर येथील प्रयोगशाळेत तक्रारीनंतर पाठविला असता उगवनशक्ती केवळ ११ टक्के असल्याचे नमूद आहे. म्हणजेच महाबीजने अप्रमाणीत बियांची उगवनशक्ती अधिक असल्याचे दर्शवून शेतकऱ्यांची फसवनूक केली आहे. ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित कराउगवनशक्ती नसणारे महाबीजचे बियाणे कुणी पास केले, कुठल्या अधिकाऱ्याने वांझोट्या सोयाबीन बियाण्यांच्या लॉटला परवानगी दिली याची चौकसी व्हायला व्हवी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अश मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.