लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.नवसाला पावणारा बहिरम बाबाची यात्रा दीड महिन्यापर्यंत भरते. यामध्ये परिसरातील आदिवासी कुटुंब तसेच कुलदैवत माननारे हजारो कुटुंब नवस फेडण्याकरिता बहिरम यात्रेत येतात. दरवर्षी २० डिसेंबरला मंदिर संस्थानच्या विश्वस्तांतर्फे विधीवत पूजन करून यात्रेची सुरुवात होते. मंदिराचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी सपत्नीक सकाळी साडे आठ वाजता बहीरम बाबा मूर्तीचे, अष्टभूजा गणेश मूर्तीचे तसेच भवानी माता व शंकराच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर परिसरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे सचिव प्रकाश ठाकरे, कोषाध्यक्ष सुरेश ठाकरे, विश्वस्त प्रेम चौधरी, सुनील ठाकरे, विठोजी चिलाटे, किशोर ठाकरेसह सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी विधिवत पूजा करून नवसाला पावणाऱ्या देवाला सर्वत्र सुख-समृद्धी व शांतता पसरू दे, असे साकडे घातले.आजपासून सुरू झालेल्या या यात्रेत यात्रेकरूंची संख्या नगण्य असली तरीही शनिवार व रविवार या दिवशी ही यात्रा गजबजून जाते. मंदिर प्रशासन रात्रंदिवस नियोजन बद्ध कार्य करून भविकाना दर्शनाकरिता अडचण येणार नाही, अशी चोख व्यवस्था करतात. बहिरम परिसर हा शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येत असून, येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनीसुद्धा मंदिर परिसराची तसेच बहिरम बाबांची पाहणी केली असल्याची माहिती दिली. बहिरम यात्रेत पंचायत समिती व जिल्हा परिषदतर्फे सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून न दिल्याने तसेच यात्रेत अनेक सुविधांचा अभाव असून, यात्रेतील दुकानदारांना व यात्रेकरूंना उघड्यावरच शौचालयला जावे लागणार आहे. तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बहिरम संस्थांनच्या महापूजेने यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:04 AM
हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेले बहिरमबाबा येथे नवस फेडण्याकरिता लाखो भक्तांची मांदियाळी बहिरम येथे जमणार आहे. आज सकाळी बहीरम बाबा संस्थांनचे विश्वस्तांनी होमहवन, अभिषेक व पूजा करून यात्रेचा शुभारंभ केला.
ठळक मुद्देविश्वस्तांतर्फे अभिषेक : होम हवन, पूजा, यात्रेत सुविधांचा अभाव