लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर दर्यापूर येथे श्री महापरायण सेवा समितीच्यावतीने प्रथमच ५१०० भाविकांच्या सहभागातून ऐतिहासिक महापारायण सोहळा जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर शुक्रवारी घेण्यात आला.महापारायणामध्ये तालुक्यातील कानाकोपऱ्यातून तब्बल ५१०० भाविकांनी सहभाग नोंदविला होता. एक हजारांहून अधिक जास्त स्वयंसेवकांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. देशात सर्वधर्म समभाव, शांतता नांदावी. शेतकºयांचे दैन्य संपावे, या हेतूने हा महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला. भव्य मंडपात विद्या पडवळ, ठाणे यांच्या उपस्थितीत सकाळी ७ पासून ग्रंथवाचनाला प्रारंभ झाला. महापारायण वाचनाला महिलांचा जास्तीतजास्त समावेश होता. पारायणानंतर दुपारी ३ पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी पारायणाला भेटी दिल्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.नितीन पवित्रकार, पंकज तराळ, कपिल देवके, गुड्डू गावंडे, अतुल गोळे , प्रभाकर तराळ, तुषार बायस्कार, नीलेश राऊत, मनोज बोर्डे, शुभम घाटे, अमोल दहीभाते, मृणाल इंगळे, शशांक धमार्ळे, झुंजार मोपारी, भारती गावंडे, नीता खडे या आयोजक मंडळींनी अनेक दिवसांपासून आपल्या अथक परिश्रमातून हा महापारायण सोहळा पार पाडला.
दर्यापुरात ५१०० भाविकांचे महापारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 9:58 PM
कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर दर्यापूर येथे श्री महापरायण सेवा समितीच्यावतीने प्रथमच ५१०० भाविकांच्या सहभागातून ऐतिहासिक महापारायण सोहळा जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर शुक्रवारी घेण्यात आला.
ठळक मुद्देश्री गजानन विजय ग्रंथ : प्रथमच आयोजन, तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद