शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:39 AM

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी यासाठी आयोग आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे. यावेळची विधानसभा निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी. कोणत्याही राजकीय पक्षाने प्रदूषणास कारक पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे नाव मतदार यादीत असणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हधिकाऱ्यांनी केले.निवडणुकीकरिता ५,०६७ बॅलेट युनिट, ३७२६ कंट्रोल युनिट व ३७९० व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व ईव्हीएमची प्रथमस्तर चाचणी ३१ ऑगस्टला पूर्ण झालेली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्राध्यक्ष व प्रत्येक केंद्रावर तीन मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार ५५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. याव्यतिरिक्त ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल यांचेही सहकार्य निवडणुकीत राहणार आहे. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक कुमक तैनात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात जिल्हालगतच्या चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. सर्व मतदारसंघांत एक-दोन दिवसात फ्लाइंग स्कॉड व सर्व पथकांचे गठण व आचारसंहितेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही मतदारसंघ मुख्यालयी ‘आरओ’ स्तरावर होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, एमसीएमसी समितीचे हर्षवर्धन पवार उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करणारआयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून आठही मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत बहुतांश पदाधिकाऱ्यांची वाहन जमा होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय ४८ तासांच्या आत सार्वजनिक ठिकाणी लागलेली राजकीय फलके, होर्डिंग काढण्यात येणार आहेत. मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही बाब करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.खर्चाची मर्यादा २८ लाखविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांची आहे व या मर्यादेच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्च करावा लागणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, व्हीओओ पथके राहणार आहेत तसेच सर्व सीमांवर चेक पोस्ट राहणार आहेत. आयोगाचे अ‍ॅपदेखील या निवडणुकीत कार्यान्वित राहील. याव्यतिरिक्त १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना तक्रार करता येणार आहे. २४ महिला केंद्रे राहतील. १० संवेदनशील केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

निवडणूक कार्यक्रमअधिसूचना प्रसिद्धी२७ सप्टेंबरउमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक४ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज छाननी५ ऑक्टोबरउमेदवारी अर्ज माघार७ ऑक्टोबरमतदान२१ ऑक्टोबरमतमोजणी२४ ऑक्टोबर

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019