गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धारी’ हेच जिल्ह्यात काहीअंशी खरे आहे. आठही मतदारसंघात एक हजार पुरुषांच्या तुलनेत सरासरी ९६८ महिला मतदार आहेत. यापूर्वी सन २०१४ मध्ये हेच प्रमाण ८९४ एवढे नीचांकीला होते. जिल्ह्यात महिलांचा टक्का पन्नास मतांनी वाढला असल्याने निर्णायक ठरणारा आहे.जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ आॅक्टोबर या अंतिम दिनांकापर्यंत २४ लाख ४९ हजार ६० मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५९ हजार ६४४ पुरुष व ११ लाख ८९ हजार ३७३ स्त्री मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ७० हजार २७१ ने जास्त आहे. एक हजार पुरुष लोकसंख्येमागे महिलांचे प्रमाण हे ९४४ एवढे आहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत १२ लाख ५८ हजार १०४ पुरुष, तर ११ लाख ८७ हजार ६२७ एवढी स्त्री मतदारसंख्या होती. म्हणजेच महिला मतदारांमध्ये पाच वर्षांत १७४६ एवढी वाढ झालेली आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक महिला मतदार धामणगाव रेल्वे मतदारसंघात आहे. येथे १,५९,८१९ पुरुष व १,५४,६४४ स्त्री मतदार आहे. येथे एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण ९६८ आहे. सर्वात कमी ९२१ हे प्रमाण दर्यापूर मतदारसंघात आहे. येथे १,५४,४४१ पुरुष, तर १,४२,२४८ स्त्री मतदार आहेत.बडनेरा मतदारसंघात दरहजारी प्रमाण ९६४ आहे. या मतदारसंघात १,८१,०७९ पुरुष, तर १७४,५२९ स्त्री मतदार आहेत. अमरावती मतदारसंघात दरहजारी प्रमाण ९४८ प्आहे. या मतदारसंघात १,७७,३०३ पुरुष व १,६८,१४९ स्त्री मतदार आहेत.तिवसा मतदारसंघात ९५२ एवढे प्रमाण आहे. यामध्ये १,५१,४५६ पुरुष ुुव १,४४,११३ महिला मतदार आहेत. मेळघाट मतदारसंघात एक हजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण ९२६ एवढे आहे. येथे १,४३,९३१ पुरुष व १,३३,२७४ महिला मतदार आहेत. अचलपूर मतदारसंघात हे दरहजारी प्रमाण ९३१ एवढे आहे. यामध्ये १,४२,२९१ पुरुष व १,३२,५०४ स्त्री मतदार आहेत. मोर्शी मतदारसंघात महिलांचे हे प्रमाण ९३७ आहे. मतदारसंघात १,४९,३६४ पुरुष तर १,३९,९१२ महिला मतदार आहेत.यंदा ९६.२८ टक्के मतदारांकडे मतदार कार्डआठही मतदारसंघांची मतदारसंख्या २४ लाख ४९ हजार ६० आहे. यापैकी २३ लाख ४८ हजार ५९८ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहे. अद्याप १ लाख ४६२ मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये नाही. २३ लाख ५७ हजार ९५३ मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. हे प्रमाण ९६.२८ ऐवढे आहे. धामणगाव मतदारसंघात ९७ टक्के, बडनेरा ९०.०१, अमरावती ९५.५७, तिवसा ९५.०८, दर्यापूर ९९.०७, मेळघाट ९७.७६, अचलपूर ९८.७९ व मोर्शी मतदारसंघात ९८.६० एवढे हे प्रमाण आहे.
Maharashtra Election 2019 ; हजार पुरुषांच्या तुलनेत ९४४ महिला मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM
गजानन मोहोड । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धारी’ हेच जिल्ह्यात काहीअंशी खरे ...
ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत ५० ने वाढ : धामणगाव रेल्वे मतदारसंघात दरहजारी सर्वाधिक ९६८ प्रमाण