शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

Maharashtra Election 2019 ; निवडणूक मनुष्यबळ नियुक्तीचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 6:00 AM

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळाची यादी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तयार करण्यात आली. हा सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आला व ही माहिती जिल्हा निवडणूक विभागाला देण्यात आली.

ठळक मुद्देयंत्रणेत समन्वयाचा अभाव : एकाच व्यक्तीला केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी कशी?

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने आवश्यक १२ हजार ६७६ व २५ टक्के राखीव असे एकूण १५ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने एकाच कर्मचाऱ्याला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या कर्तव्यासाठी पत्रे मिळाली आहेत. अमरावती, बडनेरा मतदारसंघांतील या गोंधळामुळे अनेक कर्मचाºयांना बुधवारी नाहक धावपळ करावी लागली.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळाची यादी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तयार करण्यात आली. हा सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आला व ही माहिती जिल्हा निवडणूक विभागाला देण्यात आली. याच माहितीच्या आधारे निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षणासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी शैैलेश नवाल यांच्या स्वाक्षरीचे पत्र ‘इलेक्शन अर्जंट’ असा लाल शाईचा स्टॅम्प मारून संबधित कर्मचाऱ्यांना तातडीने देण्यात आले. यामध्ये अनेक कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष (प्रीसाइडिंग आॅफिसर) व इतर मतदान अधिकारी (ओपीओ) असे दोन पत्र दिनांक ९ व १० ऑक्टोबरच्या प्रशिक्षणासाठी देण्यात आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती कुठल्या जबाबदारीसाठी व त्याने प्रशिक्षण कोणते करावयाचे, याबाबत तारांबळ उडाली. मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाते. दांडी मारणाºया कर्मचाऱ्यांवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे दोन पत्र मिळालेले कर्मचारी बुधवारच्या प्रशिक्षणासाठी शासकीय आयटीआयमध्ये उपस्थित झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बुधवारी मतदान केंद्राध्यक्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर इतर मतदान अधिकाऱ्यांचे अनावश्यक प्रशिक्षण कशासाठी, असा सवाल या संतप्त कर्मचाºयांनी केला. विशेष म्हणजे, या ठिकाणी बराच वेळपर्यंत निवडणूक विभागाचा एकही अधिकारी-कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे यासंदर्भातील अर्ज द्यावा तर कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला. यापैकी काही कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालय गाठले. जिल्हा निवडणूक विभागाने हा प्रकार मान्य केला. अशा प्रकारचे दोन पत्र काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्याला एकच प्रशिक्षण व ड्युटी करावयाची आहे. त्यांचे लेखी पत्र घेतल्यानंतर दुसरे प्रशिक्षणाचे नाव कमी करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.नेमका घोळ कशामुळे?निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळा-महाविद्यालयीन शिक्षक व प्राध्यापकांची माहिती त्या-त्या आस्थापनांना मागितली. यामध्ये एकाच वेळी अनेक ‘आरओ’चे पत्र आल्याने त्या आस्थापनांद्वारे दोन्ही आरओंकडे माहिती पाठविली. हीच माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांची पत्रे देण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्यास कारवाईनिवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने झाली असल्याचे या नियुक्तिपत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे. नेमणूक रद्द किंवा फेरबदल करण्याचे कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही व प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार कारवार्ई होणार असल्याचे नमूद आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्यास कारवाई केली जात असेल तर या गोंधळासाठी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाईचे काय, असा या कर्मचाºयांचा सवाल आहे.अमरावती, बडनेरात सर्वाधिक घोळअमरावती शहरातील अनेक शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये बडनेरा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे अमरावती व बडनेरा मतदारसंघाच्या निवडणूक विभागाने या कार्यालयांना मनुष्यबळासंदर्भात पत्र दिले. निवडणुकीसंदर्भात पत्र असल्यामुळे या आस्थापनांद्वारा दोन्ही ठिकाणी माहिती पाठविली. त्यामुळे हा घोळ झाल्याचे सांगण्यात आले. धामणगाव मतदारसंघात देखील काही कर्मचाºयांना अशाच प्रकारे दोन नियुक्तिपत्र दिल्याचे सांगण्यात आले.अमरावती व बडनेरा मतदारसंघांसाठी कार्यालयांचा डेटा वाटून दिला होता. मात्र, तो ओव्हरलॅप झाल्याने दोन्ही मतदारसंघांची पत्रे कर्मचाऱ्यांना मिळाली. ही दुरुस्ती करण्यात येत आहे. दुसऱ्या रॅन्डमायझेशनच्या वेळी १२ तारखेला कर्मचाऱ्यांना मतदारसंघाची माहिती देण्यात येईल.- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :amravati-acअमरावती