शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

Maharashtra Election 2019 ; मी जातीपातीचे राजकारण केले नाही : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM

मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. अचलपूर मतदारसंघाचे भविष्यातील व्हीजनही बच्चू कडू यांनी प्रचारसभांमधून मांडले.

ठळक मुद्देप्रचाराकरिता दिव्यांगही दाखल : गावागावांत प्रचार सभा

परतवाडा : मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या भरवशावर आज मी आपल्यापुढे उभा आहे. जातीपातीचे राजकारण मी केले नाही. आडनाव, चेहरा पाहून मी कामे केली नाहीत. सर्व गरजूंच्या मदतीला मी उभा राहिलो. सर्व जाती-पातीतील, धर्मातील लोकांची मी कामे केली आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मला दिव्यांगांसह रुग्णसेवा करता आली, असा दावा अचलपूर विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी केला.मतदारसंघातील तळेगाव मोहना, आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांच्या प्रचारार्थ राज्यातून ५० ते ६० दिव्यांग अचलपूर मतदारसंघात दाखल झाले असून आसेगाव व शिरजगाव कसबा येथील जाहीरसभेत या दिव्यांगांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती. अचलपूर मतदारसंघाचे भविष्यातील व्हीजनही बच्चू कडू यांनी प्रचारसभांमधून मांडले. या प्रचार सभांसोबतच अचलपूर, परतवाडा शहरात आपल्या संपर्क अभियानातून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. शहरातील प्रत्येक वॉर्डातील मतदारांची त्यांनी थेट भेट घेतली. कधी स्कुटरवर, तर पायी चालत ते मतदारांपर्यंत पोहोचले.आसेगावात प्रचारसभागुरूवार, १७ आॅक्टोबरला आसेगाव येथील बच्चू कडू यांच्या जाहीर प्रचारसभेत राजेश वाटाणे, प्रशांत नागापुरे, अजय तायडे, श्याम मसराम, अमोल लव्हाळे, अंकुश जवंजाळ, पुण्यावरून खास आलेले रफीकभाई, तर शिरजगाव कसबा येथील जाहीर सभेत रहेमानभाई, आबीद हुसेन, मंगेश देशमुख, जयंत गवई, रवि पाटील यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी प्रवीण पाटील, विजय थावाणी, मनोज नंदवंशी, बाळासाहेब खडसे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :amravati-acअमरावतीBacchu Kaduबच्चू कडू