Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 02:34 PM2019-10-11T14:34:53+5:302019-10-11T14:35:24+5:30

अमरावतीमध्ये ८ पैकी ८ आमदार मला युतीचे हवे आहेत. जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात

Maharashtra Election 2019: I don't understand the word debt forgiveness; I will clear debt - Uddhav Thackeray | Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे 

Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे 

Next

अमरावती - शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीतर मी कर्जमुक्त करणार आहे. कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही. जसे मागेल त्याला शेततळे आपण दिले तसे जनावरांपासून शेती सुरक्षित ठेवण्यासाठी कुंपण दिले पाहिजे ते आपण देणार आहोत. हे अन्यायाविरुद्ध बंड, धनदांडग्यांच्या विरुद्ध बंड आहे. बंड हे असलंच पाहिजे शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यासाठी बंड केले होते असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमरावतीतील जाहीर सभेत केलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बंद हॉल मधली नाही तर आपण उघड्या मैदानात असणारी माणसे  आहोत. मी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे. मला विश्वास आहे की या एका सभेमध्ये संपूर्ण अमरावती मधील उमेदवार तुम्ही निवडून द्या. मागच्या वेळेला जरा गडबड झाली. संपूर्ण देशामध्ये भगवा असताना माझ्या अमरावतीमध्ये भगवा नाही याची मला खंत आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

तसेच अमरावतीमध्ये ८ पैकी ८ आमदार मला युतीचे हवे आहेत. जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात. भगव्याचे मावळे हे विकत घेतले जात नाही हे अमरावतीकरांनी सर्वांना दाखवायचे आहे. जिंकल्यानंतर मी याच मैदानात विजयी सभा घेणार आहे. अमरावतीला  स्वाभिमान आहे. इथे पैसा चालणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. 

दरम्यान, बघतो, पाहतो, करतो असे बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो तो करतो अशी उद्धव आणि आदित्यची शिवसेना आहे. गॅस सिलेंडर हे अति वंचित लोकांना आपण देणार आहोत दिलेच पाहिजेत. मंदी  येते आहे रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी आपण जगवला पाहिजे तर देश जगणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधकातून युतीमध्ये आले कारण ते काम करण्यासाठी राजकारणात आले आहेत.  १० रुपयाचे शिवभोजन देणार आहे. १ रुपयांमध्ये गरीबांना प्राथमिक आरोग्य चाचण्या करून देणार. जी वचने मी तुम्हाला दिलेली आहेत त्याला मी वचनबध्द आहे. निवडणुकीनंतर मी पुन्हा अमरावतीमध्ये येणार आणि ही वचने पूर्ण करणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी लोकांना देत काँग्रेस पक्ष म्हणत होता की 370 कलम काढणार नाही अशा लोकांना आपण सत्ता देणार होतात का? असा सवालही उपस्थित लोकांना विचारला. 

Web Title: Maharashtra Election 2019: I don't understand the word debt forgiveness; I will clear debt - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.