लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ब.रि.पा. व मित्र पक्षाच्यावतीने सुलभा संजय खोडके यांनी अमरावती मतदारसंघात उमेदवारी दाखल केल्यानंतर आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरू केले आहे.शहर व मतदारसंघाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून सर्वांच्या सहकार्यातून येत्या पाच वर्षांत अंमलबजावणी करण्यासाठी आपण वनचबद्ध असल्याची ग्वाही सुलभा खोडके यांनी जनसामान्यांशी संवाद साधताना दिली. शहरी क्षेत्रांतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांसह वंचित घटकांतील लाभार्थींना अनेक योजनांच्या लाभप्राप्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास या संवादादरम्यान सुलभा खोडके यांच्याद्वारे दिला जात आहे. रहाटगाव परिसरात ही आशीर्वाद यात्रा मार्गक्रमण करीत असताना जनसामान्यांची थेट भेट - थेट संवादांवर भर दिल्या जात आहे. यावेळी तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींचा पाढा नागरिकांनी खोडके यांच्यासमोर मांडला. समस्यापूर्ती व लोकसेवेकरिता संधी द्यावी, असे आवाहन सुलभा खोडके यांनी आशीर्वाद यात्रेदरम्यान केले.शेगाव परिसर, व्हीएमव्ही रोड, कठोरा रोड, वडाळी परिसर, नवसारी, तपोवन, गणेडीवाल ले-आऊ ट, अर्जुननगर, संमती कॉलनी, शेगाव - रहाटगाव रोड या भागात संपन्न झालेल्या आशीर्वाद यात्रेत महिला, युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सुलभा खोडके यांच्याशी संवाद साधला. नागरिकांच्या भौतिक सुविधांची पूर्तता व तरुणांना रोजगार निर्मितीसाठी आपण वचनबद्ध असल्याचे खोडके यांनी सांगितले.
Maharashtra Election 2019 : खोडके यांचा प्रभागनिहाय आशीर्वाद यात्रेतून संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:00 AM
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ब.रि.पा. व मित्र पक्षाच्यावतीने सुलभा संजय खोडके यांनी अमरावती मतदारसंघात उमेदवारी दाखल केल्यानंतर आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरू केले आहे.
ठळक मुद्देसुलभा खोडके : नागरिकांसाठी भौतिक सुविधांच्या पूर्ततेची ग्वाही