लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शेतकरी आत्महत्यांसाठी आघाडी सरकारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपकडून केली जायची. आता त्यांचे सरकार असताना शेतकरी आत्महत्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत. तो धागा हेरून आताचे सत्ताधीश व पाच वर्षांपूर्वीचे तेच विरोधक भूमिकेपासून कसे फिरले, यावर अचूक भाष्य काँगे्रसचे उमेदवार वीरेंद्र जगताप हे व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांपुढे करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य प्रकाशझोतात आले होते. आता आमदार जगताप यांचे ‘तो सूर्य अन् हा जयद्रथ’ गाजत आहे.वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ च्या आधी सत्तेत नसताना कसे बोलायचे आणि सत्तेत आल्यावर ते काय बोलतात, यावर त्यांनी कटाक्ष केला आहे. याच फडणवीस सरकारने सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देऊ, असे आश्वासन दिलेला व्हिडीओ आमच्याकडे आहे. प्रत्यक्षात सोयाबीनला किती भाव आहे, हे मतदार शेतकरी जाणतातच, असे भाष्य करीत जगताप यांनी राज्य सरकारची पोलखोल केली.मतदारांकडूनच घेतात उत्तरेकर्ज माफ झाले काय? शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला काय? स्वामिनाथन आयोग नेमला काय? पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळाले काय? असे प्रश्न घेऊन वीरेंद्र जगताप जनतेसमोर जात आहेत. त्याची उत्तरे जनतेकडूनच घेत आहेत. या प्रचारसभेला पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक सवाई, विनोद चौधरी, सचिन रिठे, विशाल रिठे, अमर कणसे, प्रवीण कुंभलकर, सरफराज खान, समीर दहातोंडे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 ; धामणगाव रेल्वे मतदारसंघात ‘लाव रे तो व्हिडीओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM
वीरेंद्र जगताप यांनी गुरुवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर, वडाळा, हिवरा मुरादे, पिंपरी रिठे, सुकळी गुरव, कोहळा जटेश्र्वर, काजना, राजना, पापळ, वाढोणा रामनाथ या गावांतील ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना कसे फसविले, हे पटवून देण्यासाठी वीरेंद्र जगताप यांनी डिजिटल प्रचाराला सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : प्रचारसभेत युती सरकारचे वाभाडे