मोर्शी : रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चिखल झाला. त्यामुळे निवडणुकीसाठी साहित्य घेऊन मतदानस्थळी जाणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागली.विधानसभा निवडणुकीचे साहित्य यंदा जिल्हा परिषदेचे मैदान व तेथील हॉलमधून रविवारी सकाळी वाटप करण्यात आले. मोर्शी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर येथूनच मतदान पथके रवाना झाली. मात्र, सकाळी १० च्या पुढे मुसळधार पाऊस आल्याने प्रशासनाची पळता भुई थोडी झाली. साहित्य वाटपाच्या ठिकाणी मंडप वॉटरप्रूफ नसल्याने तो गळू लागला. चिखल होऊ नये यासाठी मंडपाच्या आतील भागात मोठी चटई टाकण्यात आली. मात्र त्यावरून ये-जा झाल्याने संपुर्ण परिसरात चिखल पसरला. हजारो कर्मचारी व पोलिसांना जेवणासाठी जागा मिळाली नाही. हवामान खात्याचा अंदाज नेहमीच खरा होत नाही, असा विश्वास दृढ झाल्याने महसूल यंत्रणेने पावसाची शक्यता फारशी मनावर घेतली नव्हती.
Maharashtra Election 2019 ; निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM