लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युवा स्वाभिमान पक्ष व महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत रवि राणा यांनी शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानापासून आशीर्वाद पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.शनिवारी सकाळी ९ वाजता शंकरनगर परिसरातून महारॅलीची सुरुवात झाली. कंवरनगर, नंदा मार्केट, रेडियन्ट हॉस्पिटल, कल्याणनगर, मोतीनगर चौक, फरशी स्टॉप, सुदर्शन बिल्डिंग, संताजीनगर, गोसावी कॉलनी, महावीरनगर, नवाथे अंडरपास, नवाथे चौक, रविनगर चौक, हनुमान मंदिर या मार्गाने मार्गक्रमण करून साईनगर येथील साई मंदिरात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. मतदारांशी संवाद साधत, त्यांच्याशी हस्तांदोलन करीत, त्यांचे अभिवादन स्वीकारत खासदार नवनीत राणा यांनी बडनेरा मतदारसंघातील उमेदवार तथा आमदार रवि राणा यांचा प्रचार केला.खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच्या नावावर दिशाभुल नाही तर प्रत्यक्ष विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत पोहचविण्याची ग्वाही खा. नवनीत राणा यांनी दिली.गत १० वर्षामध्ये रवि राणा हे ग्रामीण बाज असलेल्या बडनेरा मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांना समाजातील विविध घटकांचा व्यापक प्रतिसाद लाभत असल्याचा दावा खा. नवनीत राणा यांनी मतदारांशी संवाद साधताना केला.
Maharashtra Election 2019 ; नवनीत राणा यांची पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM
खा. नवनीत रवि राणा या संपूर्ण बडनेरा मतदारसंघामध्ये फिरून जाहीर सभा तसेच जनसंवाद आशीर्वाद पदयात्रेद्वारे रवि राणा यांचा प्रचार केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी खा. नवनीत रवि राणा यांनी अनवाणी पायाने महिला-भगिनींसोबत आशीर्वाद पदयात्रेला काढली विकासाच्या नावावर दिशाभुल नाही तर प्रत्यक्ष विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत पोहचविण्याची ग्वाही खा. नवनीत राणा यांनी दिली.
ठळक मुद्देविजयाचा संकल्प : शंकरनगर ते साईमंदिर मतदारांशी संवाद