लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कुठलाही भेद न करता मागील १५ वर्षा$ंपासून प्रहारतर्फे नि:स्वार्थ रुग्णसेवा सुरू आहे. अचलपूर मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नागरिकांना जिल्हापातळीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनताच आपली चौथ्यांदा विजयश्री खेचून आणेल. प्रहारचे विचार आणि विकासाचा ध्यास याच्या बळावरच विजयाचा चौकार मारू, असा विश्वास चांदूर बाजार तालुका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.चांदूर बाजार स्थित आनंद सभागृहात तालुका मुख्य प्रचार कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन पार पडले. यावेळी मंचावर नगरसेवक सचिन खुळे, आबिद हुसेन, सरदार खान, नजीर कुरेशी, सुभाष मेश्राम, अ. रहमान, जवाभाई यांच्यासह शहराध्यक्ष आबू वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते. आ. कडू पुढे म्हणाले, रुग्णसेवा व समाजकार्याने प्रहार पक्ष सर्वश्रुत केला आहे. पक्षाचे विचार जाती-धर्मापलीकडचे असल्याने अपक्ष उमेदवार असूनही मतदारसंघातील जनतेने १५ वर्षांपासून आमदार बनविले. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात रुग्णसेवेला विसरू नका; प्राधान्य सेवाकार्याला द्या, असा सल्ला आ. कडू यांनी दिला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्याम मसराम, पंचायत समिती सदस्य मुन्ना बोडे, संतोष किटुकले, बाजार समिती संचालक विनोद जवंजाळ, मंगेश देशमुख, सतीश मोहोड, अश्विन भेटाळू, गणेश पुरोहित, रवि सूर्यवंशी, कैलास सारडा, अजय राऊत, मोहन विधळे, राजाभाऊ किटुकले, सलीम सरकार, सचिन पिसे, मंगेश ठाकरे, भैयासाहेब काळे, शरद तायडे, अ. हाफीज अ. कादर, राजू पखालेंसह शेकडो प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 ; विकासाच्या जोरावर विजयाचा चौकार मारू : बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM
अचलपूर मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नागरिकांना जिल्हापातळीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनताच आपली चौथ्यांदा विजयश्री खेचून आणेल. प्रहारचे विचार आणि विकासाचा ध्यास याच्या बळावरच विजयाचा चौकार मारू, असा विश्वास चांदूर बाजार तालुका प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देप्रचार कार्यालयाचे उद्घाटन : प्रचारात रुग्णसेवेला विसरू नका